हसू आणि आसूने भरलेल्या 'कन्नी'चा टिझर भेटीला; हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत

 अभिनेत्री हृता दुर्गेळे ही एक अशी अभिनेत्री आहे जी नेहमीच चर्चेत असते. गेले अनेक दिवस हृताच्या सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर हृताचा खूप मोठा चाहचा वर्ग आहे. लवकरच कन्नी हा हृताचा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Jan 31, 2024, 01:56 PM IST
हसू आणि आसूने भरलेल्या 'कन्नी'चा टिझर भेटीला; हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत title=

मुंबई : सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत आहेत. ओले आले, पंचक, झिम्मा २ नंतर अनेक असे सिनेमा आहेत ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यातचं नवा कोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणालर आहे. कन्नी असं या सिनेमाचं नाव असून येत्या ८ मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कन्नी या सिनेमात हृता दुर्गेळे ही अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत असून बऱ्याच दिवसांनी हृताचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेले अनेक दिवस या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे.

मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, '' पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे 'कन्नी' करते तसेच आपल्या आयुष्यातही  मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक 'कन्नी' असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही 'कन्नी' सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ८ मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.''