ही अभिनेत्री आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी

 हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री तुम्हाला माहीत आहे का? 'ला ला लॅंड' या सिनेमात प्रमुख भूमिका बजावणारी एम्मा स्टोन ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2017, 06:21 PM IST
ही अभिनेत्री आहे जगातील सर्वाधिक कमाई करणारी  title=

लंडन :  हॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री तुम्हाला माहीत आहे का? 'ला ला लॅंड' या सिनेमात प्रमुख भूमिका बजावणारी एम्मा स्टोन ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. तिने तब्बल १६६.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'ला ला लॅंड' या सिनेमाने आपले नाव ऑस्कर पुरस्कारावर कोरले आहे. या सिनेमाला तब्बल सहा ऑस्कर पुरस्कार मिळालेत.  एम्मा स्टोन ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री असल्याचे फोर्ब्स मॅगझिनने जाहीर केले आहे. २८ वर्षांच्या या अभिनेत्रीने गेल्या वर्षभरात २.६ कोटी डॉलर कमाई केलेय. अर्थात १६६.४ कोटी इतकी तिची संपत्ती आहे.

'ला ला लॅंड' या सिनेमात केलेल्या भूमिकेबद्दल तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. यावर्षी लिंग समानतेसाठीही तिने आवाज उठवला होता. पुरुष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे, अशी मागणी तिने केली होती.  

Emma Stone reveals her male co-stars took pay cuts for her

फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा नंबर लागतो. जेनिफर एनिस्टनने गेल्या वर्षात २,५५ कोटी डॉलरची कमाई केली आहे. प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे.  याशिवाय ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे. या यादीत जेनिफर लॉरेन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. लॉरेन्सने गेल्या वर्षभरात २.४  कोटी डॉलरची कमाई केली आहे. मात्र, तिच्या संपत्तीत घट झालेली पाहायला मिळत आहे.