'CID' फेम अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

घडलेल्या या घटनेनंतर इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

Updated: Jun 13, 2022, 05:12 PM IST
'CID' फेम अभिनेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार title=

मुंबई : 'CID' फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेता  हृषिकेश पांडे याच्यासोबत नुकतीच एक भयंकर घटना घडली आहे. सुपरहिट टीव्ही शो सीआयडीमध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या हृषिकेशसोबत नुकतीच चोरीची घटना मुंबईत घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याकडून रोख रक्कम, त्याच्या पर्सनल वस्तू आणि इतर अनेक गोष्टी देखील चोरीला गेल्या आहेत.

हृषिकेश कुटुंबासह फिरायला बाहेर पडला होता
हृषिकेश आपल्या कुटुंबासह बसमधून प्रेक्षणीय स्थळी पर्यटनासाठी निघाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावेळी त्याने स्लिंग बॅग नेली होती. यादरम्यान चोरट्यांनी त्याचं सगळं सामान लुटलं. रिपोर्ट्सनुसार, ही घटना ५ जूनची आहे. मात्र आता याचा खुलासा झाला आहे.

बसने कुलाब्याला जात होते
या घटनेबाबत एका वेबसाईटशी बोलताना हृषिकेशने सांगितलं की, त्याने कुटुंबासह एलिफंटा लेणीला भेट दिल्यानंतर कुलाब्यातील ताडदेव येथे जाण्यासाठी बसमध्ये बसला होता. अभिनेता म्हणाला, 'आम्ही साडेसहा वाजता एसी बसमध्ये बसलो होतो. मी एक स्लिं बॅग घेतली होती. बसमधून उतरल्यावर मी माझी स्लिंग बॅग तपासली.

बॅगेतून रोख रक्कम गायब होती
हृषिकेश पुढे म्हणाला, 'माझी रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रं बॅगेतून गायब होती. याबाबत मी तात्काळ कुलाबा पोलीस ठाणे आणि मालाड पोलीस ठाण्यात माहिती दिली. हृषिकेश सीआयडीमध्ये इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसला होता.