Akshay Kumar आणि Rohit Shetty मध्ये जुंपली! Video Viral

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Oct 28, 2022, 05:40 PM IST
Akshay Kumar आणि Rohit Shetty मध्ये जुंपली! Video Viral title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) गेल्या वर्षीच्या 'सूर्यवंशी' चित्रपटात दिसले होते. वास्तविक, अक्षय कुमारनं शेअर केलेला एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी मारहाण करताना दिसत आहेत. नक्की ते दोघं कोणत्या गोष्टींवरून भांडत आहे ते जाणून घेऊया...

व्हिडिओच्या सुरुवातीला, अक्षयची सहकलाकार कतरिना कैफ तिच्या फोनवरून एक बातमी वाचताना दिसत आहे. त्यानंतर ती फोन बाजूला काढते आणि रोहित आणि अक्षय हे भांडू लागतात. दोघांमध्ये बाचाबाची होते. दोघांनी आधी एकमेकांची कॉलर धरली आणि मग एकमेकांवर मुक्के मारायला सुरुवात केली. संपूर्ण टीम दोघांना पकडून वेगळे करते. (there was a fierce fight between akshay kumar and rohit shetty video viral)
 
जाणून घ्या या लढतीचे संपूर्ण सत्य...
हा व्हिडिओ 2019 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या भांडणानंतर रोहित आणि अक्षयने देखील हे सर्व विनोद असल्याचे सांगितले होते आणि करण जोहर देखील सोशल मीडियावर दोघांमध्ये मजेदार कमेंट करत दिसला. मात्र, दोघांमधली ही झुंज मजेशीर पद्धतीने झाली. हा व्हिडीओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 190 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत सुपरस्टार अजय देवगण आणि रणवीर सिंग देखील दिसले होते.