दारुण पराभवानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! पराभूत उमेदवारांना दिलं 'हे' काम; 'आवश्यक पुरावे...'

Raj Thackeray Ask Lost Candidates To Do This Work: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सव्वाशेपेक्षा अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं झालं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 28, 2024, 03:44 PM IST
दारुण पराभवानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! पराभूत उमेदवारांना दिलं 'हे' काम; 'आवश्यक पुरावे...' title=
राज ठाकरेंनी बैठकीमध्ये सूचना केल्याची मनसे नेत्याची माहिती (फाइल फोटो, सौजन्य- राज ठाकरेंच्या फेसबुकवरुन साभार)

Raj Thackeray Ask Lost Candidates To Do This Work: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सव्वाशेपेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवल्यानंतरही राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागी विजय मिळवता आलेला नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीनंतर मुंबई आणि उपगनगरामधील पराभूत उमेदवारांची मतं जाणून घेतल्यानंतर आता राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पराभूत उमेदवारांबरोबरच जिल्हाध्यक्षांना एक महत्त्वाचं काम दिलं आहे. यासंदर्भातील खुलासा पुण्यामध्ये आज पार पडलेल्या बैठकीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच दिली आहे. 

राज ठाकरेंचा दोन दिवस पुण्यात मुक्काम

विधानसभा निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांबरोबरच आणि जिल्हाध्यक्षांची राज ठाकरेंनी आज पुण्यात बैठक बोलावली होती. सकाळी नऊ वाजता सर्व उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांनी बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या बैठकीमध्ये पराभवाची कारणे आणि पुढील वाटचालीसाठी काय करता येईल याबद्दल चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार नवी पेठ येथील संकल्प बँक्वेट हॉलमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंबरोबरची बैठक पार पडली. मुंबईमधील बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबरची जवळीक महागात पडली असं पराभूत उमेदवारांनी यापूर्वीच राज ठाकरेंना काळवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील या बैठकीमध्ये पराभूत उमेदवाराचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. 

नक्की वाचा >> पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'

पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिलं हे काम

राज ठाकरेंनी दोन दिवस पुणे दौऱ्यावर विविध पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी झालेल्या बैठकीमध्ये काय घडलं यासंदर्भातील तपशीलही समोर आला आहे. या बैठकीमध्ये मुंबई वगळता राज्यभरातून उभ्या केलेल्या पराभूत उमेदवारांनी हजेरी लावली होती. या बैठकीत काय झालं याबद्दलची माहिती मनसेचे पक्ष नेते बाबू वागसकर यांनी सारमाध्यमांशी बोलताना सांगितला. "मनसेच्या बैठकीत ईव्हीएमविषयी सर्वच उमेदवाराकडून शंका उपस्थित करण्यात आली," असं वागसकर म्हणाले. एवढ्यावरच न थांबता या शंका ऐकून राज ठाकरेंनी काय निर्देश दिले याबद्दलही वागसकर यांनी सांगितलं. "उमेदवारांनी शंका उपस्थित केल्यानंतर त्यावर उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांनी आवश्यक पुरावे गोळा करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत," असं वागसकर म्हणाले.

नक्की वाचा >> ठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडण्याची...; प्रश्न ऐकताच हात जोडत फडणवीस म्हणाले, 'मला याची...'

"पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांचे मत ऐकून घेतल्यानंतर पुढील तीन-चार दिवसात राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत," असंही वागसकर यांनी सांगितलं.