Ambadas Danve on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलं असतं तर विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) मतदान 2 ते 5 टक्क्यांनी वाढलं असतं असा दावा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अती आत्मविश्वास निर्माण झाला असंही सांगितलं. तसंच काँग्रेसमध्ये 10 जण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते असाही दावा केला.
स्वबळावर लढण्यासंबंधी विचारण्यात आलं असता अंबादास दानवे म्हणाले की, "मी काल ताकद निर्माण केली पाहिजे अशी भूमिका मांडली. स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामला लागलं पाहिजे असं मी म्हटलं होतं. महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे असं मी म्हणालेलो नाही". पुढे ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 33 जागा निवडून आलो. तेव्हाही तेच मतदार होते आणि आताही तेच मतदार आहेत. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे गेलं असतं तर चार-पाच टक्के मतदान वाढलं असतं आणि सर्वांना फायदा झाला असता".
"काँग्रेसचे लोक तर कोणतं मंत्रिपद, खातं मिळणार याच्यावर चर्चा करत होते हे सत्य आहे. मुख्यमंत्रिपदासाठी तर 10 जण इच्छुक होते. उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर झालं असतं तर मतं वाढली असती. काँग्रेसला जर त्यांचा मुख्यमंत्री हवा होता तर त्यांनी नाव जाहीर करायला हवं होतं. उद्धव ठाकरेंनी तुम्ही नाव जाहीर करा, मी पाठिंबा देतो म्हटलं होतं. पण तसंही झालं नाही," असं अंबादास दानवे म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता त्यांनी आमच्याकडे तशी चर्चा नाही असं स्पष्ट केलं.
मनसे कोणाच्या बाजूने आणि विरोधात होते त्यांनी स्पष्ट करावं असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच फडणवीस मुख्यमंत्री व्हावे हे सुस्पष्ट नसल्याने वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे असा टोला लगावला.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, "त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाने ठरवलं तर त्यांना बहुमत मिळवता येईल. एकदा शिंदे यांना रिवार्ड मिळाला असून तो पुन्हा पुन्हा मिळणार नाही". चांगले उद्योग गुजरातला नेण्याचं काम सुरू आहे. प्रदूषण करणारे उद्योग आमच्याकडे आणले जात आहेत असा संताप त्यांनी व्यक्त केला.
ईव्हीएमसंबंधी विचारलं असता त्यांनी याचिकेतून काहीतरी निघेल. बॅलेटवर घ्यायला का घाबरतात? जनतेच मत असेल, लोकांची इच्छा असेल तर मतदान घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उभारी घेईल. ताकदीने महाराष्ट्रासाठी लढणार आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 184/7
|
VS |
NEP
180/6(20 ov)
|
| England beat Nepal by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AFG
(20 ov) 182/6
|
VS |
NZ
183/5(17.5 ov)
|
| New Zealand beat Afghanistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.