मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा अनेक वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, या शोमधील 'जेठालाल' ही व्यक्तिरेखा दिलीप जोशींआधी या 5 कॉमेडियन्सना ऑफर करण्यात आली होती.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो 2008 मध्ये सुरू झाला. तेव्हापासून या शोमध्ये अभिनेता दिलीप जोशी 'जेठालाल'ची भूमिका साकारत आहेत. आज लोक त्यांना 'जेठालाल' या नावाने हाक मारतात. आश्चर्याची बाब म्हणजे आज घरोघरी प्रसिद्ध झालेली व्यक्तिरेखा करायला कोणीच तयार नव्हतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जेठालाल'चं पात्र सगळ्यात आधी अभिनेता अली असगरला ऑफर करण्यात आलं होतं. पण त्यावेळी अली अनेक शोमध्ये व्यस्त होता. त्यामुळेच त्याने या भूमिकेसाठी नकार दिला. यानंतर कॉमेडियन अहसान कुरेशीलाही 'जेठालाल'ची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव त्याने डेली सोपचा भाग होण्यास नकार दिला होता.
'हप्पू सिंग' म्हणून ओळख निर्माण करणारा अभिनेता योगेश त्रिपाठीलाही तारक मेहतामध्ये 'जेठालाल'ची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण त्यानेही ही भूमिका करण्यास नकार दिला.
'द कपिल शर्मा शो'मध्ये 'बच्चा यावद'ची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदा देखील या यादीत सामील आहे कारण त्यालाही जेठालालची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण त्यानेही ही ऑफर धुडकावून लावली.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने लोकांना पोट धरुन हसवणाऱ्या राजपाल यादवलाही 'जेठालाल'ची भूमिका देण्यात आली होती. पण तो अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, त्यामुळेच त्याने या शोमध्ये काम करण्यास नकार दिला होता.