मुंबई : करण जोहरच्या कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनला येत्या 7 जूलैपासून सुरुवात होणार आहे. हा शो सुरु होण्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. करण जोहरच्या या शोमध्ये दोन दिग्गज अभिनेत्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्टार्सनी ही ऑफर नाकारल्याने करणला मोठा धक्का बसलाय.
कॉफ़ी विथ करणच्या 7 व्या सीझनमध्ये अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या लिस्टमध्ये साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेता व अभिनेत्रींची देखील नावे समोर आली आहे. अभिनेता विजय देवरकोंडा, पु्ष्पा फेम अल्लू अर्जून, नेशनल क्रश रश्मिका मंदना यांसारख्या स्टार्सचे नाव समोर येत असताना, काही स्टार्सनी या शोमध्ये सहभाग घेण्यास नकार दिला आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांनी करण जोहरच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. आता यामागचे कारण काय याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.पण करणच्या शोमध्ये या दोघांना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. ही बातमी समजल्यानंतर साऊथ स्टार्सच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. कारण प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्टार्सच्या आयुष्यातील रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो.
करणच्या शोमध्ये नेमके कोण-कोणते स्टार्स सहभाग घेणार आहेत, या स्टार्सची अद्याप संपुर्ण माहिती समोर आली नाही आहे. मात्र अनेक दिग्गज स्टार्सची नाव चर्चेत आहेत.