कोण आहे ही कंगना...? प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्यानं अभिनेत्रीला ओळखण्यास दिला नकार

Actor Annu Kapoor on Kangana Ranaut: अभिनेत्यानं भर प्रेस कॉन्फरन्ससमोर दिला कंगना रणौतला ओळखण्यास नकार...

दिक्षा पाटील | Updated: Jun 21, 2024, 04:44 PM IST
कोण आहे ही कंगना...? प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्यानं अभिनेत्रीला ओळखण्यास दिला नकार title=
(Photo Credit : Social Media)

Actor Annu Kapoor on Kangana Ranaut:  बॉलिवूडमध्ये जवळपास 50 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणारे अभिनेता अन्नू कपूर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बहुप्रतिक्षित 'हमारे बारह' या चित्रपटाला घेऊन चर्चेत आहेत. खरंतर, या चित्रपटामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. पण या गोष्टीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. आज त्यांचा हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होतोय. अशात संपूर्ण टीमसाठी एका प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. 

या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान, अनेक प्रश्नाची उत्तर अन्नू कपूरनं नाराजगी व्यक्त केली आहे. या दरम्यान, त्यांनी खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतला ओळखण्यास नकार दिला तर दुसरीकडे संजय लीला भन्साळींवर देखील निशाणा साधला आहे. संजय लीला भन्साळी यांनी हिंदूंची खिल्ली उडवल्याचे त्यांनी म्हटले. खरंतर, कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्या प्रकरणाविषयी अन्नू कपूर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी कंगनाला ओळखण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की 'कोण आहे कंगना? कोणी मोठी अभिनेत्री आहे? सुंदर आहे?' तर या सगळ्यात एका पत्रकारानं सांगितलं की कंगना नुकतीच मंडी मतदार संघातून जिंकून आली आहे आणि ती एक नवीन खासदार आहे. यावर अन्नू कपूर यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ओहो ते पण झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे याविषयी बोलताना अन्नू कपूर म्हणाले, जर मी असं काही बोललो, तर सगळ्यात आधी अन्नू कपूर मुर्खांसारखं बोलतो. त्यानंतर जर कोणी येऊन मला कानशिलात लगावतंय तर मी नक्कीच कायदेशीर कारवाई करेन. या संपूर्ण प्रेसकॉन्फर्न्समधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

हेही वाचा : अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये 4 लाख रुपयांची चोरी, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद

हा व्हिडीओ batamiwalaentertainment या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय अन्नू कपूर यांच्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान, लोकप्रिय निर्मात आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर देखील संतापले आहे. त्यांनी म्हटलं की संजय लीला भन्साळीला चप्पलेनं मारलंय. त्यांचा धर्मावर विश्वास नाही. त्यांनी स्वत: सांगितलं होतं की ते नास्तिक आहेत आणि सांगितलं की त्यांना कधीच धर्मांच्या वादात पडायला आवडत नाही. इतकंच नाही तर अन्नू कपूर यांनी संजय लीला भन्साळींवर हिंदूंची खिल्ली उडवल्याचा आरोप केला आहे.