close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'भूल भुलय्या'च्या सिक्वलमध्ये झळकणार 'ही' अभिनेत्री?

चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार याबाबत चर्चा रंगत आहेत. 

Updated: Sep 18, 2019, 01:17 PM IST
'भूल भुलय्या'च्या सिक्वलमध्ये झळकणार 'ही' अभिनेत्री?

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'भूल-भूलय्या' चित्रपटाच्या सिक्वलच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगत आहेत. 'भूल भुलय्या २' चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन झळकणार आहे. चित्रपटाचा फर्स्टलूक देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमीका कोण साकारणार याबाबत चर्चा रंगत आहेत. तर चित्रपटात कबिरच्या प्रेमात उध्वस्त झालेली प्रिती म्हणजेच अभिनेत्री कियारा अडवाणीचं नाव समोर येत आहे. 

पिंकव्हिलाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चित्रपटात कियारा आडवाणी मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यापासून सुरूवात होणार आहे. कियारा-कार्तिक या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाचं स्क्रिन शेअर करणार आहेत. 

२००७ रोजी प्रदर्शित झालेला अभिनेता अक्षय कुमारच्या 'भूल भुलय्या' चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. विनोदी भयावह कथेवर आधारलेल्या 'भूल भुलय्या' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते.