Adah Sharma buys Sushant Singh Rajput Flat : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतनं 14 जून 2020 रोजी मुंबईत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांत ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, तो फ्लॅट इतके दिवस खाली होता. या फ्लॅटला विकण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला पण कोणी हा खरेदी केला नाही. इतकंच नाही तर या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यात एक पोस्ट देखील समोर आली होती, ज्यात हा फ्लॅट पाच लाख रुपये या भाडेतत्वावर देणार असल्याचे म्हटले होते. आता मोठी बातमी समोर आली आहे की सुशांतचं हे घरं विकण्यात आलं आहे. त्याचं हे घर खरदे करण्याचा निर्णय बॉलिवूड अभिनेत्रीनं केला आहे. द केरला फाइल्स या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अदा शर्मानं हा फ्लॅट विकत घेतल्याचे म्हटले जात आहे.
तेव्हा तीन वर्षांपासून हा फ्लॅट खाली होता. त्याला ना कोणी खरेदी करत होतं ना कोणी भाडेतत्वावर राहायला देखील तयार नव्हतं. आता सुशांतचा फ्लॅट विकण्यात आला आहे. असं म्हटलं जात आहे की सुशांत सिंह राजपूत राहत होता त्याच फ्लॅटला अदानं विकत घेतलं आहे. सुशांतच्या निधनानंतर त्या फ्लॅटमध्ये कोणी भाडेतत्वावर देखील राहण्यास तयार नव्हता. हा फ्लॅट तीन वर्षांपासून खालीच होता. खरंतर सुशांतच्या निधनानंतर त्याचा हा फ्लॅट अनेकदा चर्चेचा विषय ठरला. रिपोर्ट्सनुसार, सुशांतचं हे घर भाडेतत्वावर घेण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी देखील अनेकांनी इच्छा जाहिर केली. मात्र, अदा शर्मानं स्वत: हा फ्लॅट तिनं विकत घेतल्याचे सांगितलेले नाही.
हेही वाचा : लाखो मुलींच्या मनावर राज्य करणाऱ्या दुलकर सलमानच्या लग्नासाठी आई-वडिलांनीच निवडली मुलगी!
सुशांत सिंह राजपुतनं मुंबईच्या राहत्या घरी गळफास लावत आत्महत्या केल्यानंतर. चौकशी करण्यात आली तर पोलिस आणि सीबीआय अनुसार, त्यानं आत्महत्या केल्यानं त्याचे निधन झाले. तर त्याच्या चाहत्यांना आजही या गोष्टीवर विश्वास बसत नाही ती तो आज त्यांच्यासोबत नाही. त्याचे चाहते त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सुशांतला कोणी विसरायला नको म्हणून त्याचे चाहते अनेक गोष्टी करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्याच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण अनेकांनी सांगितले की हा व्हिडीओ AI जनरेटेड आहे.