बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय गायिकेचा फोननंबर लीक!

Bollywood Singer's phone Number Leaked : या लोकप्रिय गायिकेचा फोन नंबर सोशल मीडियावर लीक झाला आहे. त्यामुळे तिला तासाभरात 100 पेक्षा जास्त लोकांचे कॉल आल्याचे तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 3, 2023, 03:54 PM IST
बॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय गायिकेचा फोननंबर लीक!  title=
(Photo Credit : Social Media)

Sona Mohapatra : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणजे सोना मोहपात्रा. सोना मोहपात्रा ही तिच्या दमदार आवाजासाठी ओळखली जाते. उत्तम आवाजाच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. सोना कायमचं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता सोना मोहपात्रा ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोना मोहपात्राचा फोन नंबर लीक झाला असून तिला तासाभरात 100 पेक्षा जास्त फोन आल्याचे तिनं म्हटलं आहे. 

सोना मोहपात्रानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याविषयी सांगितलं आहे. सोना मोहपात्रा या पोस्टमध्ये म्हणाली की 'कोणी तरी माझा पर्सनल मोबाईल नंबर वर्ल्ड वाईड वेबवर लीक केला आहे. तोच नंबर आता टेलीग्रामवरही व्हायरल झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मला सतत स्पॅम कॉल येत आहेत. साधारणपणे एका तासात मला 100 फोन आले आहेत. माझा नंबर कोणी लीक केला हे मला अजूनही कळलेलं नाही. पण, लवकरच मी शोधून काढेन. जेव्हा मला या फोन कॉलबद्दल कळेल त्यावेळी मी त्या व्यक्तीला सोडणार नाही'. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही पोस्ट शेअर करत कॅप्शन देत सोना मोहपात्रा पुढे म्हणाली की 'तुमच्यापैकी जे मला सतत कॉल करुन त्रास देत आहेत त्यांनी सावध व्हा. मी तुमचे नंबर लिहून ठेवले आहेत. लवकरच मी ते सायबर सेल पोलिसांकडे देणार आहे.' 

हेही वाचा : वडिलांनी तुझ्या शरीराचा वापर केला; ट्रोलर्सच्या 'त्या' वक्तव्यावर लेक पूजा भट्ट संतापली

सोनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'काळजी घे, कारण तुम्ही एकदा सेलिब्रिटी झालात ना की कोणालाही तुमच्या प्रायव्हसीशी काही घेणं देणं नसतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'बरं झालं तू इथे सांगितलंस, त्यांचे नंबर देखील इथे शेअर करायला हवे होतेस.' तिसरा नेटकरी म्हणाले, 'ज्या कोणी हे केलं त्याला लाज वाटायला हवी.'

सोना मोहपात्राविषयी बोलायचे झाले तर तिनं आजवर अनेक गाणी गायली आहेत. 'आय हेट लव्ह स्टोरी' या चित्रपटातील 'बहारा', 'तलाश' चित्रपटातील 'जिया लागे' ना, 'फुक्रे' या चित्रपटातील 'अंबरसरिया' ही काही गाणी प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्या करतात.