ड्रग्स प्रकरणात NCB च्या रडारवर येऊ शकतात हे बॉलिवूड स्टार

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ड्रग्ज रॅकेटमध्ये फसण्याची शक्यता आहे. 

Updated: Sep 22, 2020, 03:32 PM IST
ड्रग्स प्रकरणात NCB च्या रडारवर येऊ शकतात हे बॉलिवूड स्टार title=

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ड्रग्ज रॅकेटमध्ये फसण्याची शक्यता आहे. रिया ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोणचं ही नाव पुढे आलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टारांपैकी असलेली दीपिका पादुकोणचे नाव ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर आले आहे. दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा यांची ड्रग चॅट समोर आली आहे. कथित गप्पांमध्ये डी आणि के नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार गप्पांमध्ये डी म्हणजे दीपिका पादुकोण आणि के म्हणजे करिश्मा प्रकाश. 2017 च्या या चॅटमध्ये हॅश आणि वीडचा उल्लेख आहे.

हे कलाकार एनसीबीच्या रडारवर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या रडारवर आता असे सर्व कलाकार येणार आहेत ज्यांचा पीआर के.व्ही.ए.एन. कंपनी आहे. या कलाकारांची नावे खालील प्रमाणे आहेत.

1. दीपिका पादुकोण
२. श्रद्धा कपूर
3. सोनम कपूर
4. रणबीर कपूर
5. हृतिक रोशन
6. टायगर श्रॉफ
7. जॅकलिन फर्नांडिस

दीपिकाच्या ड्रग्स 'हॅलोविन पार्टी'चे सत्य

बॉलिवूडमधील दीपिका पादुकोणच्या 'हॅलोविन पार्टी'मध्ये ड्रग्जसह आता तीन आणखी नावे पुढे आले आहेत. सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर यांचं नाव पूढे आलं आहे. 28 ऑक्टोबर 2017 च्या रात्री त्याच ठिकाणी (कोको) हॅलोविन पार्टी झाली. या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणसह सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आदित्य रॉय कपूरचाही समावेश होता. या पार्टीनंतर दोन दिवसांने कोको पबने फोटो फेसबुक पेजवर शेअर केले आहे. सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आदित्य रॉय कपूर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न झी न्यूजने केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.