खुशी कपूरचा नवा टॅटू, हे आहे कनेक्शन

पाहा काय आहे टॅटूचा अर्थ 

खुशी कपूरचा नवा टॅटू, हे आहे कनेक्शन

मुंबई : खुशी कपूर सध्या आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहिली आहे. मात्र आता ती ट्रेंड  सेटर बनणार असल्याची चर्चा आहे. नुकताच खुशीचा नवा टॅटू चर्चेत नजरेत बसला आहे. हा टॅटू लहान असला तरीही श्रीदेवी, बोनी कपूर आणि जान्हवी कपूर या संपूर्ण कुटुंबाला सामावून घेणार आहे. 

उदयपुरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ईशा अंबानीच्या प्री वेडिंग पार्टीत खुशी देखील उपस्थित होती. यावेळी खुशीने फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. यावेळी सगळ्यांची नजर खुशीच्या लेहंग्यापेक्षा तिच्या टॅटूवर सर्वाधिक होती. 

नुकताच खुशीचा हा फोटो मनीष मल्होत्रा यांनी आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवरून देखील शेअर केला आहे. ज्या फोटोत खुशीचा टॅटू अगदी सुंदर दिसत आहे. या फोटोतील तिचा टॅटू जास्त आकर्षक वाटत आहे. 

 

कुटुंबाच्या प्रेमापोटी तयार केला हा टॅटू 

मिळालेल्या माहितीनुसार, खुशीचा हा टॅटू रोमन अंकांनी तयार केलेला आहे. थोडास सस्पेंसफुल असलेल्या या टॅटू कुटुंबातील सगळ्यांच्या वाढदिवसाच्या तारखा आहेत. टॅटूची सुरूवात खुशीच्या जन्म तारखेपासून आहे. तिचा वाढदिवस 5 नोव्हेंबर असून रोमन अंकात 'V' असं लिहिलं आहे. यानंतर 'VI' ही जान्हवीची जन्मतारिख. यानंतर 13 ऑगस्ट 'XIII'श्रीदेवीची जन्मतारिख त्यानंतर शेवटी बोनी कपूर यांची जन्मतारिख 11 नोव्हेंबर 'XI'म्हणजे हा टॅटू V VI XIII XI अशा स्वरूपात दिसतो. 

तसं पाहायला गेलं तर बोनी कपूर यांना आपल्या पाचही मुलांमध्ये खुशी कपूर सर्वाधिक आवडते. आणि तिने हा टॅटू काढून ती 'ब्युटी विथ ब्रेन' असल्याचं स्पष्ट केलं आहे. या छोट्याशा टॅटूत तिने संपूर्ण कुटुंबाला सामावून घेतलं आहे.