मुंबई : पूर्वा कौशिक म्हणजेच आपली लाडकी 'शिवा'. शिवाच्या लुक पासून ते तिच्या डायलॉग पर्यंत ह्या पात्राने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले आहे. मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच शिवाचे चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी 'शिवा मालिकेच्या सेटवर एक चिमुकली फॅन तिची वाट पाहत होती. पूर्वा ह्या फॅन मोमेन्ट बद्दल बोलताना म्हणाली, 'खरतर ही खूप गोड गोष्ट होती, मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे 'शिवा' मालिका करत असताना बऱ्याच लोकांशी भेट होते आणि काही प्रेक्षक सेटवर आम्हाला भेटायला ही येतात आणि खूप कौतुक ही करतात. लोकांच्या बोलण्यामधून कळत की लहान मुलांचा वर्ग प्रचंड 'शिवा' प्रेमी आहे.
याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक खूप क्युट मोमेन्ट आहे 'एक मुलगा साधारण ३ वर्षाचा असावा त्याची आई त्याला म्हणाली काय करतोस? असं नको करुस तर तो त्याच्या आईला म्हणाला की 'हा' नको म्हणूस 'ही' म्हण इतकी त्याला 'शिवा' आवडते. आणखीन एक किस्सा सांगावासा वाटतो एक मुलगा आपल्या आई- बाबानं सोबत सिनेमा पाहत होता आणि त्यात ती हेरॉईन रडत होती तर तो म्हणतो 'ह्यां ! शिवा असं रडते का , शिवा नाही असं रडत हे कशाला रडतायत'. त्या दिवशी सेटवर एक लाहान शिवाची चाहती आली होती ती आमच्या मालिकेत सायलेन्सर म्हणून भूमिका साकारत असलेला अर्जुनची लहान बहीण आहे.
ती सकाळी लवकर सेट वर माझ्यासाठी फुलं घेऊन आली होती आणि नेमकं त्याच दिवशी माझा कॉल टाईम संध्याकाळचा होता. ती माझी आतुरतेने वाट पाहत होती. अर्जुनचा पॅक-अप झाल्यावर ही ती १ तास वाट पाहत होती मी येईपर्यंत आणि जेव्हा तिनी मला पहिले तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता मी तो शब्दात व्यक्त नाही करू शकत. मी तो क्षण फोटो मध्ये कॅपचर करायचा प्रयत्न केला पण तो क्षण माझ्या हृदयात कोरला गेला आहे. तिचे डोळे इतके तृप्त झाले होते शिवाला भेटून. जेव्हा असं कौतुक होतं ते ही लहान निरागस मुलांकडून ते खूप भारावून टाकणार असतं. ती तिच्या आईला सांगत होती की आपण शिवाला घेऊन घरी जाऊया किंवा आपण इथेच सेटवर थांबूया. मग तिला समजावून मी घरी पाठवले. असे क्षण कलाकारांची ऊर्जा वाढतात अजून उत्तम काम करण्यासाठी प्रेरित करतात.'
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
58/2(24.3 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.