फोटोत दिसणारी ही चिमुकली पद्मश्रीनं सन्मानित ते बॉलिवूड स्टारची पत्नी, ओळखलं का?

ही चिमुकली लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Aug 25, 2022, 11:50 AM IST
फोटोत दिसणारी ही चिमुकली पद्मश्रीनं सन्मानित ते बॉलिवूड स्टारची पत्नी, ओळखलं का? title=

मुंबई : या फोटोत दिसणारी चिमुरडी कोण आहे ओळखू शकता का? ही मुलगी आज चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि त्यासोबत ती एका मोठ्या अभिनेत्याची पत्नी देखील आहे. इतकंच नाही तर मोठं झाल्यानंतर या मुलीनं जेव्हा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा तिनं अनेक विक्रम केले आणि तिला पद्मश्री देऊन तिला गौरवण्यात आलं. ही अभिनेत्री कोण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

या फोटो दिसणारी मुलगी काजोल (Kajol) आहे. काजोल ही तिची आई तनुजा यांच्याप्रमाणेच अप्रतिम अभिनेत्री आहे. काजोल चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या कुटुंबातील आहे. तनुजा या 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट केले. काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे देखील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. इतकंच नाही तर काजोलची आजी आणि आजोबा देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते होते. काजोलची आजी शोभना समर्थ 50 च्या दशकातील अभिनेत्री होत्या. तर आजोबा कुमारसेन समर्थ निर्माते होते.

आणखी वाचा : मालदीवच्या बीचवर अर्जुन कपूरच्या बहिणीचा Hot Look, पाहून मलायकालाही येईल कॉम्प्लेक्स

this Little Girl Is A Bollywood s big Actress And Wife Of A Superstar Won Padma Shri And Many Awards worked with shahrukh khan in many blockbuster movies

काजोलची मावशी नूतन देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अभिनेता मोहनीश बहल हे नुतन यांचे पुत्र. यामुळे मोहनशी बहल हे काजोलचे चुलत भाऊ आहेत. दिग्दर्शक अयान मुखर्जी हा देखील काजोलचा चुलत भाऊ आहे. काजोलचे कुटुंब अनेक दशकांपासून आणि पिढ्यांपासून चित्रपटांमध्ये असल्याने तिला अभिनयाचा वारसा मिळाला.

काजोलनं 1992 मध्ये 'बेखुदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी ती 16-17 वर्षांची होती. या चित्रपटात काजोलची आई तनुजाही होती. या चित्रपटातून काजोलला नोटिस करण्यात आले होते. 'बाजीगर' सुपरहिट तर झालाच, पण काजोल आणि शाहरुखची जोडीही चांगलीच गाजली. यानंतर काजोलला चित्रपटाच्या ऑफर्स मिळू लागल्या. 

this Little Girl Is A Bollywood s big Actress And Wife Of A Superstar Won Padma Shri And Many Awards worked with shahrukh khan in many blockbuster movies

काजोल आणि शाहरुख खान या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले. यात 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'दिलवाले' यासह अनेक चित्रपट आहेत. अजय देवगणसोबतही काजोलनं अनेक हिट चित्रपट दिले. 1994 मध्ये 'गुंडाराज' चित्रपटात काम करत असताना काजोल अजय देवगणच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काजोल आणि अजय देवगणनं 1999 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर काजोल करिअरसोबतच मुलं आणि घर दोन्ही सांभाळत आहे. 

आणखी वाचा : बोल्ड कपडे अन् Video Call, 'ही' अभिनेत्री ठरतेय चर्चेचा विषय

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये काजोल एक आहे.