मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमध्ये या वर्षाचील सर्वात ग्लॅमरस आणि फेमस लग्न हे अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमचे होते. दीपिका आणि शोएबच्या कपलच्या लग्नाची चर्चा चांगलीच झाली. या कपलच्या लग्नाननंतर टीव्हीवरील आणखी एका जोडप्याने गुपचूप लग्न केलेय. कलर्स टीव्हीवरील मेरी आशिकी तुमसे ही फेम अॅक्टर शक्ती अरोराने गर्लफ्रेंड नेहा सक्सेनाशी लग्न केलेय. ६ एप्रिलला मुंबईत दोघांनी नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत लग्न केले. दरम्यान यांच्या लग्नाचा फोटो अद्याप समोर आलेला नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नेहाने या वृत्ताला दुजोरा दिलाय.५ जून २०१४मध्ये या कपलने दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सतत सुरुच होती. पहिल्यांदा ते नोव्हेंबर २०१६मध्ये लग्न करणार होते. मात्र नोटाबंदीमुळे त्यांनी लग्न पुढे ढकलले.
नच बलिएच्या ७व्या सीझनमध्ये शक्ती आणि नेहा यांनी जोडप्याच्या रुपात सहभाग घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटपासून दूर असलेला शक्ती अरोरा पुन्हा छोट्या प़डद्यावर येण्यास सज्ज झालाय.