मुंबई : प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करणारी वाहिनी म्हणजे झी मराठी. झी मराठी कायमच प्रेक्षकांसाठी दर्जेदार मालिका घेऊन येत असते. झी मराठीवरील तुला पाहते रे, माझ्या नवऱ्याची बायको, लागिरं झालं जी आणि चला हवा येऊ द्या यासारख्या लोकप्रिय मालिका सुरू आहेत. आता झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आणखी खास कार्यक्रमत घेऊन येत आहे. झी मराठीवर नवे दोन शो सुरू होणार आहेत. या शोबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे.
झी मराठीवर एक म्युझिकल आणि दुसरा टॉक शो असे 2 शो सुरू होणार आहेत. या शोचे सूत्रसंचालन आदेश बांदेकर आणि संजय मोने करणार आहेत त्यामुळे प्रेक्षकांसाठी हे कार्यक्रम नक्कीच खास असणार आहेत. झी मराठीवर गेल्या 12 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमातील आदेश बांदेकर यांच सूत्रसंचालन अतिशय लोकप्रिय आहे. आदेश हे महाराष्ट्रातील सर्व महिलांचे लाडके भाओजी आहेत. असं असताना आता आदेश बांदेकर झी मराठीवर नवा म्युझिकल शो घेऊन येत आहेत. त्यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीला पडेल यात काही शंकाच नाही.
तसेच अभिनेता संजय मोने एका टॉक शोचं सुत्रसंचालन करणार आहेत. या शोबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच हे दोन्ही शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका 'जागो मोहन प्यारे' ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील बानू आणि लहान परी यांमुळे हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. या मालिकेला लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच पसंत करत होते.