प्राजक्ता माळीच्या 'रानबाजार' मधील 'त्या' सीनवर चाहते भडकले

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार नुकतीच प्रदर्शित झाली आहे. 

Updated: May 23, 2022, 05:54 PM IST
प्राजक्ता माळीच्या 'रानबाजार' मधील 'त्या' सीनवर चाहते भडकले title=

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की.

दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला आले आहेत. पानसे यांच्या 'रानबाजार' या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. ही वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अवघ्या काही वेळातच या वेबसिरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

'रानबाजार' या सीरिजचा ट्रेलर प्लॅनेट मराठी सोशल मीडियावर शेअर केला होता. या वोबसिरीजनंतर प्राजक्ता आणि तेजस्विनीची जोरदार चर्चा सुरुये. याच बरोबर या सिरीजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचं कौतूक होत आहे.  

या वेबसिरीजमध्ये  प्राजक्ता माळीसह तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येताच . या सिरीजने धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे या वेबसिरीजच्या प्राजक्ता माळीच्या टीझर वर युजर्स तुटून पडले आहेत. प्राजक्ता माळीच्या बोल्ड सीनवर चाहते तीव्र प्रतिक्रीया देत आहेत. 

या वेबसिरीजच्या ट्रेलर पाहाताच यावर कमेंट करत ट्रोलर्सने प्राजक्ता माळी ट्रोल केलं आणि कमेंट करत म्हटलं की, फक्त राजकीय चित्र दाखवलं असत तर बर झालं असतं, टिझर मध्ये adult scene दाखवून देऊन  ट्रेलरची वाट बघणाऱ्या आंबट शौकिनाचा पुरता भ्रमनिरास झाला असणार....  याचबरोबर अजून एका युजर्सने कमेंट करत म्हटलंय की, 'तुझ्याकडून या अपेक्षा नव्हत्या'... 

रान बाजार मधील अभिनय खुपचं छान केला आहे पण आपण जो Bold सीन दिला त्या बदल जरा मनाला वाईट वाटले कारण की तुम्हाला एक चांगली अभिनेत्री म्हणून मानतो,पण कलाकारांना या सव॔ गोष्टी माफ असतात कारण की समाजा समोर खरी भुमिका आपण मांडली त्या बदल आपले अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.