close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलग आठव्या दिवशी 'वॉर' चित्रपटाची दमदार कमाई

 'वॉर' चित्रपट सलग चढत्या क्रमांकावर 

Updated: Oct 10, 2019, 08:03 PM IST
सलग आठव्या दिवशी 'वॉर' चित्रपटाची दमदार कमाई

मुंबई : बॉक्स ऑफीसवर आणि ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' चित्रपट सलग चढत्या क्रमांकावर आहे.  पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत सामाविष्ट झालेल्या 'वॉर' चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास ५३ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला होता. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी चित्रपटाने २०० कोटींच्या घरात एन्ट्री केली आहे. कामाच्या दिवसांतही चित्रपटाच्या गल्ल्यात वाढ होत आहे. 

बुधवारी चित्रपटाच्या गल्ल्यात जवळपास ११ ते १२ कोटींची भर पडली आहे. हिंदी, तमिळ,तेलगू मिळून चित्रपटाने २२७ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. ट्रेंड अॅनलिस्ट तरण आदर्शयांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 'वॉर' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफची जुगलबंदी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. 'वॉर' चित्रपट जवळपास ३ हजार ८०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 
 
'खालीद कभी मेरा स्टूडंट हुआ करता था, अब उसे लगता हैं की वो अपने टिचर से आगे चला गया हैं...' अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' येत्या काळात किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.