Ileana D’Cruz ने शेअर केलेले थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर चर्चेत

इलियाना डिक्रूझचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Apr 23, 2021, 10:17 PM IST
Ileana D’Cruz ने शेअर केलेले थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर चर्चेत title=

मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर अनेक थ्रोबॅक फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये अभिनेत्री स्विमिंग पूल आणि सुमद्राच्या किना-यावर बसून आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इलियानाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर खूपच आवडले आहेत. इंस्टाग्रामवर 7 लाखाहून अधिक लोकांना हे फोटो आवडले आहेत. त्याचबरोबर तिचे चाहते फोटोंवर प्रतिक्रिया देखील देत आहेत. याव्यतिरिक्त तिने पाण्याखाली काढलेले फोटो देखील शेअर केले आहेत. तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही बुमरॅंग व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये ती पांढर्‍या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून खास कॅप्शनही लिहिले आहेत.

अलीकडे तिचं ट्विटर हॅक झाल्याची बातमी आली होती. इलियानाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली.

इलियाना डिक्रूझच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती नुकतीच 'द बिग बुल' या वेब चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने पत्रकाराची भूमिका साकारली होती. बिग बुल हा 1992 चा शेअर बाजारातील घोटाळ्यावर आधारित चित्रपट आहे. चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन इलियाना डिक्रूझ व्यतिरिक्त मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन याने शेअर बाजाराचे प्रसिद्ध दलाल हर्षद मेहता यांची भूमिका साकारली होती.