'या' वेबसाईटवर ठग्स ऑफ हिंदुस्तान लीक

कुठे पाहायला मिळणार ठग्स... 

'या' वेबसाईटवर ठग्स ऑफ हिंदुस्तान लीक  title=

मुंबई : आमीर खान आणि अमिताभ बच्चन स्टारर सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी जवळपास 7000 स्क्रिनवर रिलीज झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा सिनेमा अगदी पहिल्याच दिवशी इंटरनेटवर लीक झाला. यामुळे मेकर्स आणि आमीर खान, अमिताभ बच्चन यांना मोठा फटका पडणार आहे. तसेच  ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यातील बऱ्याचजणांचा अपेक्षाभंग झालाय. समिक्षकांना देखील हा सिनेमा फारसा रुचलेला दिसत नाही. असं असताना देखील रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने 4 नवे रेकॉर्ड केले आहेत. या चित्रपटाचे पहिल्या दोन दिवसांचे शो हाऊसफुल झालेत. 

पण आता समोर आलं आहे की, हा सिनेमा अगदी पहिल्याच दिवशी लीक झाला आहे. 'तमिल रॉकर्स' नावाच्या वेबसाइटवर या सिनेमाची पायरेटेड कॉपी डाऊनलोडकरता उपलब्ध आहे. यामुळे आमीर आणि बिग बी यांचे चाहते खूप नाराज झाले आहे. 

या अगोदर याच संकेतस्थळावर तमिळ अभिनेता विजय याचा 'सरकार' हा सिनेमा वेबसाइटवर लीक झाला होता. तेव्हा तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स काऊंसिलने असे सांगितले होते की, या साईटवर होणारी पायरेसी आणि होस्टिंग थांबवलं पाहिजे.