'टायगर 3' नाही तर कतरिना कैफ चर्चेत येण्याचं 'हे' ठरलय कारण

Katrina Kaif : कतरिना कैफ सध्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसत असली, तरी ती चर्चेत येण्याचं कारण काही वेगळंच आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 18, 2023, 10:04 AM IST
'टायगर 3' नाही तर कतरिना कैफ चर्चेत येण्याचं 'हे' ठरलय कारण title=
(Photo Credit : Social Media)

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ ही केवळ बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि समृद्ध अभिनेत्रींपैकी एक नाही तर एक चांगली व्यावसायिक महिला देखील आहे. मुख्यतः तिच्या सौंदर्यप्रसाधन लाइन 'के ब्युटीच्या' यशामुळे ती चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कतरिनाला तिच्या बिझनेसचा जागतिक स्तरावर प्रवासा कसा होता आणि त्याविषयी थोडक्यात विचारण्यात आले. तर कतरिनानं त्याविषयी बोलताना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

2019 मध्ये 'के ब्युटी'च्या स्थापनेमागील विचाराविषयी कतरिना कैफने एक खास गोष्ट शेअर केली. एक महिला उद्योजिका म्हणून तिच्या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली 'कोणत्याही प्रमाणात जाहिराती ही वस्तुस्थिती बदलू शकत नाहीत कारण ग्राहक आणि आपले प्रेक्षक सत्य पाहू शकतात. त्यांना काय विकले गेले आहे आणि ते प्रोडक्ट किती योग्य आहे हे त्यांना चांगलंच कळतं. '#ItsKayToBeYou' मोहिमेसह, एक उदाहरण म्हणून, Kay Beauty, एक कंपनी म्हणून, चार वर्षांपासून कार्यरत आहे. त्यातही ग्राहकांना काय अपेक्षित आहे तेच बनवण्याचा प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर ते टिकाऊ देखील असेल यासाठी काम करण्यात प्राधान्य देत आहे. तिच्या ब्रँडने लिंग, वय, रंग आणि ओळख यांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांसाठी हे प्रोडक्ट्स बनवले आहेत. कारण हे ब्रँड आत्म्यावर प्रेम करतं. या पॅनलमध्ये अनैता श्रॉफ अदजानिया, बंदना तिवारी आणि लक्ष्मी मेनन यांचाही समावेश होता, ज्यांनी भारतीय सौंदर्याची एक वेगळीच कल्पना, बदलत्या धारणा, अभिव्यक्ती आणि फॅशन आणि सौंदर्य उद्योगातील आव्हाने आणि संधी यांचा सखोल अभ्यास केला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिना कैफचे तिच्या उद्योजकीय प्रवासावरचे प्रतिबिंब चित्रपट आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांमध्ये ट्रेलब्लेझर म्हणून तिचा प्रभाव अधोरेखित करते. फॅशन उद्योगातील अग्रगण्य आणि दूरदर्शी लोकांचा समावेश असलेल्या समुदायामध्ये, तिने काही बदल आणण्याचा प्रयत्न केला असून यात तिची महत्त्वाची भूमिका आहे. सिनेमा आणि व्यवसायावरील तिचा दुहेरी प्रभाव तिला एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून स्थान देतो, सौंदर्य आणि त्यासोबत ग्लॅमरच्या जगात तिचा मोलाचा वाटा आहे. 

हेही वाचा : ऋषिकेशमध्ये चहा विकायचा 'हा' मुलगा, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

कतरिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसते. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर इम्रान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत