PHOTO : टायगर श्रॉफच्या 'बागी-२'चा फर्स्ट लूक

अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपल्या अॅक्शन थ्रिलर 'बागी - २' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील टायगरचा लूक सोशल मीडियावर लीक झाला. 

Updated: Nov 3, 2017, 04:38 PM IST
PHOTO : टायगर श्रॉफच्या 'बागी-२'चा फर्स्ट लूक title=

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपल्या अॅक्शन थ्रिलर 'बागी - २' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील टायगरचा लूक सोशल मीडियावर लीक झाला. 

टायगरचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. या फोटोमधला टायगरचा इन्टेन्स लूक प्रेक्षकांना आवडलाय. 

या सिनेमातही टायगर दमदार अॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे. आपल्या भूमिकेसाठी टायगरनं खूप मेहनत घेतलेली या फोटोतूनही दिसतेय. त्यानं या सिनेमासाठी पाच किलो वजनही वाढवलंय. 

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'बागी' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या सिनेमात टायगरची रिअल लाईफ लव्ह दिशा पटनीही दिसणार आहे. 'बागी - २' पुढच्या वर्षी २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.