close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टायगर श्रॉफ मायकल जॅक्सनची डान्स स्टेप करतो तेव्हा...

टायगर श्रॉफ मायकल जॅक्सन यांचा मोठा चाहता आहे

Updated: Jun 25, 2019, 07:05 PM IST
टायगर श्रॉफ मायकल जॅक्सनची डान्स स्टेप करतो तेव्हा...

मुंबई : हॉलिवूडचे प्रसिद्ध सिंगर आणि डान्सर मायकल जॅक्सन यांची आज १०वी पुण्यतिथी आहे. २५ जून २००९ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. मायकल जॅक्सन यांच्या पुण्यतिथिनिमित्त बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने मायकल जॅक्सन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. टायगर श्रॉफ मायकल जॅक्सन यांचा मोठा चाहता आहे. त्याने सोशल मीडियावर मायकल जॅक्सन स्टाइलमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे.

टायगरने इन्स्टाग्रामवर 'पद्मावत' चित्रपटातील 'खलीबली' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनही दिलं आहे 'विश्वासही बसत नाही की मायकल जॅक्सन यांना जाऊन ९ वर्ष झाली आहेत. खिलजींनीही त्यांचं सिंहासन तुम्हाला दिलं असतं.' 

टायगर श्रॉफने त्याच्या अनेक मुलाखतीत तो मायकल जॅक्सन यांचा अतिशय मोठा चाहता असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्याने मायकल जॅक्सन यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. टायगर श्रॉफ बॉलिवूडमधील उत्तम डान्सर्सपैकी एक आहे. टायगर त्याच्या आगामी 'बागी ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.