बहुप्रतिक्षित 'टायगर जिंदा है' झाला रिलीज

दबंग खान सलमानचा बहुप्रतिक्षित टायगर जिंदा है प्रदर्शित झालाये...'ट्युबलाईट' फ्लॉप झाल्यामुळे हा सिनेमा हिट करण्यासाठी सलमानने कंबर कसलीये..या सिनेमाच्या निमित्ताने सलमान-कतरिना तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे साहजिकचं त्यांच्या फॅन्सला या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 22, 2017, 10:22 AM IST
बहुप्रतिक्षित 'टायगर जिंदा है' झाला रिलीज title=

मुंबई : दबंग खान सलमानचा बहुप्रतिक्षित टायगर जिंदा है प्रदर्शित झालाये...'ट्युबलाईट' फ्लॉप झाल्यामुळे हा सिनेमा हिट करण्यासाठी सलमानने कंबर कसलीये..या सिनेमाच्या निमित्ताने सलमान-कतरिना तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे साहजिकचं त्यांच्या फॅन्सला या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.. 

यशराज फिल्मससारखं तगडं बॅनर, फॉरेनची महागडी लोकेशन्स, जबरदस्त एक्शन सीन्स, सलमान-कतरिनाची सिझलिंग केमिस्ट्री यामुळे टायगर जिंदा है या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सुकता आहे.. 

ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाडके कमाई केली..मात्र या वर्षी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ट्युबलाईट या सिनेमाने मात्र सगळ्यांचीच निराशा केली..या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही..त्यामुळेचं आता दबंग खानने वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी सलमानने कोणतीही कसर सोडलेली नाही.