सलमान खानने शेअर केला 'टायगर जिंदा है' मधील हा रोमांचक क्षण ...

तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.  

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 13, 2017, 04:26 PM IST
सलमान खानने शेअर केला 'टायगर जिंदा है' मधील हा रोमांचक क्षण ...   title=

मुंबई : तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.  

'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामध्ये सलमान खान अ‍ॅक्शन आणि रोमान्स करताना दिसणार आहे.  

नवा व्हिडिओ 

काही वर्षांपूर्वी 'वक्त' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार कुत्र्यांसोबत झगडताना दिसला होता. मात्र आता 'टायगर जिंदा है' चित्रपटामध्ये बर्फाळ डोंगरांमध्ये सलमान खान कोल्ह्यांशी झगडताना दिसणार आहे. 

यशराज फिल्मने या बाबातचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सलमान खानच्या भूमिकेची आणि अ‍ॅक्शनपटाचा अंदाज येतो. व्हिडिओमध्ये अंगावर शहारा आणणारा हा सिक्वेल सिनेमागृहामध्ये पाहणं अधिकच थरारक ठरणार आहे. कोल्हा आणि सलमानमधील ही झटपट सलमान जिंकतो का ? हे पाहण्यासाठी सिनेमा पहायलाच हवा. 

 

 

कधी होणार रीलिज ?

'एक  था टायगर' चित्रपटाचा सिक्वेल ' टायगर जिंदा है' हा चित्रपट २२  डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.  अली अब्बास जाफर दिग्दर्शित या सिनेमामध्ये सलमान आणि कॅटरिनाला पुन्हा एकत्र पाहणं त्यांच्या चाह्त्यांसाठी पर्वणी आहे.  

गाणी आणि ट्रेलर हीट 

'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या ट्रेलरला रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. त्यापाठोपाठ आलेल्या 'दिल दिया गल्ला' आणि ' स्वॅग से स्वागत' हे गाणंदेखिल हीट ठरलं आहे.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x