अक्षयच्या पॅडमॅनचे पोस्टर प्रदर्शित...

 बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट येऊ घातला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 13, 2017, 04:01 PM IST
अक्षयच्या पॅडमॅनचे पोस्टर प्रदर्शित... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा चित्रपट येऊ घातला आहे. नवीन वर्षात तो प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने वेळोवेळी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. आता त्याने शेअर केलेले पोस्टर काही खास आहे. 

चित्रपटाची अनोखी कथा

या चित्रपटात सोनम कपूर मुख्य भुमिकेत आहे. पॅडमॅनची निर्मिती अक्षयच्या पत्नीने ट्विंकल खन्नाने केली आहे. चित्रपटाची कथा अरुणाचलम मुरुगनंथम नावाच्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा विषय अनोखा आहे. अरुणाचलम या व्यक्तीने स्वस्त दरात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स बनवून एक क्रांतिकारी बदल केला होता. कॉलम लिहिण्यासाठी रिसर्च करताना ट्विंकलला या कथेचा सापडली. आणि ती वाचल्यानंतर तिने यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

पोस्टर केले शेअर

हे पोस्टर शेअर करताना अक्षयने चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यावरून ट्रेलर लवकरच प्रदर्शित होईल, असे चित्र दिसत आहे. ट्विंकल देखील याबद्दल उत्सुक आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 26 जानेवारीला प्रदर्शित होईल. 

अक्षयचे सामाजिक भान

काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'टॉयलेट: एक प्रेमकथा' हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरला. याच मार्गावर पुढे जात हा अक्षयचा नवीन चित्रपट आहे. आपल्या चित्रपटातून सामाजिक बाबींबाबत जागरूकता निर्माण करण्याचा अक्षय प्रयत्न करत आहे.