Tillotama Shome On Shooting Intimate Scenes: 'नेटफ्लिक्स'वरील 'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर' वेब सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये मानव कौल आणि तिलोत्तमा शोम या दोघांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजचं नाव आणि त्याचा ट्रेलर पाहूनच ती इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली असतानाच आता यामधील एक इंटीमेट सीनही चर्चेत आहे. मान कौलने साकारलेला चार्टड अकाऊंट हा सर्वसामान्यांप्रमाणे निरस आयुष्य जगत असतो असं दाखवण्यात आलं आहे. आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी तो शरीरविक्रेय करणारा पुरुष म्हणजेच जिगेलो म्हणून काम करु लागतो. हा एक प्रकारचा क्राइम कॉमेडी- ड्रामा असून त्यामधील तिलोत्तमा आणि मानवचा इंटीमेट सीन चर्चेत असताना हा सीन शूट करताना अनुभव तिलोत्तमाने शेअर केला आहे.
तिलोत्तमा शोमने या सीनआधीच्या तयारीबद्दल बोलताना, केवळ निर्माते आणि कलकारांचा चांगला हेतू या एकमेव आधारावर असे सीन शूट करता येत नाहीत असं म्हटलं. "दिग्दर्शक (पुनित कृष्णा आणि अमृत राज गुप्ता) यांनी मला प्रत्येक सीनचा पूर्ण स्टोरीबोर्ड समजावला. आमची मिटींग बराच वेळ सुरु होती. आम्ही प्रत्येक गोष्टीवर बोललो. आपण केवळ चांगली लोकं आणि मित्र असल्याने उत्तम इंटीमेट सीन शूट करु शकतो हे बरोबर नाही. मला नाही वाटतं की ते नैसर्गिकरित्या आपल्याल करता येईल. त्यासाठी फार प्लॅनिंगची गरज असते," असं तिलोत्तमा म्हणाली.
हा इंटीमेट सीन शूट करण्याची घाई नको असं तिलोत्तमाने दिग्दर्शकांना सांगितलं. कलाकार म्हणून मला मानवला ओळखण्यासाठी वेळ हवा होता. "मी मानवला ओळखत नव्हते. तो उत्तम कलाकार आहे. मात्र आम्ही सेटवर मैत्री करायला गेलो नव्हते. आम्हाला एकमेकांबरोबर समतोल साधण्यासाठी वेळ लागला. आम्ही सुरुवातीलाच तो इंटीमेट सीन शूट केला असता तर? त्यामुळे कलाकाराला समजून घेणारे दिग्दर्शक असणे फार महत्त्वाचं असतं," असं तिलोत्तमाने 'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'अश्लीलतेने थक्क झालो, याविरुद्ध...'; Netflix चा 'हा' Trailer पाहून संतापले सर्व CA
तिलोत्तमाने यापूर्वी 'लस्ट स्टोरीज-2' आणि 'किस्सा'मध्येही बोल्ड सीन दिले आहेत. असे सीन शूट करण्यासंदर्भात बोलताना तिलोत्तमाने, "कधीतरी तुमच्या सोबतचा पुरुष कलाकार फार सहज हे करु शकतो. मात्र तुम्ही जेव्हा जे शूट केलं आहे ते पाहता तेव्हा तुम्हाला फार विचित्र वाटतं. कारण अशा उत्कट भावना पाहणं आपल्यालाच विचित्र वाटू लागतं. म्हणून मी सर्व काळजी घेऊनच असले सीन शूट करते," असं सांगितलं.
"आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही स्वत: तिथे कम्फर्टेबल नसाल तर तुम्हाला फार तणाव जाणवतो. तुम्ही तणावत असाल तर तुमच्या कामाबद्दल, तुमच्याबद्दल चुकीचा संदेश जाऊ शकतो," असं तिलोत्तमा म्हणाली.
नक्की पाहा >> 'हा Video संपूच नये असं वाटतं', परेश रावल यांची पोस्ट; लोक म्हणाले, 'Account स्विच करायला विसरलात'
'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर'मधील सीन शूट करण्यासंदर्भात बोलताना तिलोत्तमाने, "आम्हाला दिग्दर्शकांनी इतक्या वेळा तुम्ही कम्फर्टेबल आहात ना असं विचारलं की विचारता सोय नाही. त्यांनी आम्हाला नकार देण्याचा अधिकारही दिला होता. जे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळेच मला इंटीमसी कॉर्डीनेटरची गरज लागली नाही. मला फार सुरक्षित वाटत होतं. मी थेट बोलू शकत होते. उलट कोणी मध्यस्थी असेल तर त्यामुळे गोष्टींची गती मंदावते. त्यांनी यामध्ये मानवलाही सहभागी करुन घेतलं होतं. माझा चेहरा आणि शरीराच्या हालचालीवरुन मी कम्फर्टेबल आहे की नाही हे त्यांना समजत होतं," असं तिलोत्मा म्हणाली.
Iss tax season, MOST wanted hai yeh CA Topper, inke chahne wale- gangsters, police aur
Tribhuvan Mishra CA Topper, coming on 18 July, only on Netflix!#TribhuvanMishraCATopperOnNetflix pic.twitter.com/7OYaEo3Q7E— Netflix India (@NetflixIndia) July 9, 2024
या वेब सीरिजमध्ये श्वेता बासू प्रसाद, शुभ्रज्योती भरत, फैजल मलिक, जितीन गुलाटी आणि इतर कलाकार आहे. ही वेब सीरिज 18 जुलै रोजी प्रदर्शित झाली आहे.