Netflix Show New Show Vulgarity: 'नेटफ्लिक्स'ची आगामी वेब सीरिज 'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर' प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरुन निर्मात्यांवर टीका केली जात आहे. या वेब सीरिजला विरोध करणाऱ्यांना 'नेटफ्लिक्स'वरही आगपाखड केली आहे. या वेब सीरिजमध्ये चार्टड अकाऊटंट्सला नकारात्मक पद्धतीने चित्रत करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या मालिकेमध्ये एक अकाऊंटंट गुन्हेगारी विश्वास कशाप्रकारे गुंतत जातो हे दाखवण्यात आलं आहे.
'त्रिभुवन मिश्रा : सीए टॉपर'चा ट्रेलर 9 जुलै रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये थेट प्रमुख भूमिकेतील व्यक्तीरेखा चार्टड अकाऊंट असल्याचं दाखवण्यात आलं असून त्यांची पार्श्वभूमी सांगण्यात आलेली नाही. यामध्ये मान कौलने साकारलेला चार्टड अकाऊंट हा सर्वसामान्यांप्रमाणे निरस आयुष्य जगत असतो असं दाखवण्यात आलं आहे. आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी तो शरीरविक्रेय करणारा पुरुष म्हणजेच जिगेलो म्हणून काम करु लागतो. हा एक प्रकारचा क्राइम कॉमेडी- ड्रामा आहे. यामध्ये बरीच बोल्ड दृश्य असतील असा चाहत्यांचा अंदाज असून ट्रेलरमध्ये त्याचेच संकेत मिळत आहेत. या चित्रपटामध्ये तिलोत्तमा शोमने प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.
अनेकांनी सोशल मीडियावर यावरुन आक्षेप घेतला आहे. तर काहींनी मात्र या अनोख्या कथानकाचं कौतुक केलं आहे. तुम्हीच पाहा ट्रेलर...
Iss tax season, MOST wanted hai yeh CA Topper, inke chahne wale- gangsters, police aur
Tribhuvan Mishra CA Topper, coming on 18 July, only on Netflix!#TribhuvanMishraCATopperOnNetflix pic.twitter.com/7OYaEo3Q7E— Netflix India (@NetflixIndia) July 9, 2024
"मी नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी वेब सीरिजचा विरोध करतोय. मी नेटफ्लिक्स इंडिया विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन ही वेब सीरिज काढून टाकावी. #boycott_CA_Topper मी सर्वांना विनंती करेन की हे रिपोस्ट करावं," असं एका युझरने या वेब सीरीजला विरोध करताना म्हटलं आहे. "सीए टॉपर नाव ठेवलं नसतं तरी चाललं असतं. सीएशी संबंधित काही कंटेट यामध्ये आहे असं वाटत तर नाही," असं अन्य एकाने म्हटलं आहे.
"एक चार्टड अकाऊटंट म्हणून मी या ट्रेलरमधील अश्लीलतेमुळे फार दुखावलो आहे. यामधून या प्रोफेशनचा अपमान केला जात आहे. मी ही वेब सीरिज प्रदर्शित करण्याबद्दल पुन्हा विचार करावा असं सुचवेल. या प्रकरणामध्ये चार्टड अकाऊंट ऑफ इंडियाने तातडीने कारवाई करुन या अवमानाविरोधात कारवाई करावी," असं अन्य एकाने म्हटलं आहे.
1)
CA background तो नहीं है still writers से पूछना चाहता हूं कि क्या सोच क़े ऐसा script लिखे थे ? CA कौन होते है पता है ना ?
— LIT (@lzyintrdytrdr) July 10, 2024
2)
This needs to be addressed by @theicai
Using the name of a Noble Profession in such a series is not tolerable.
Some Opinions might differ. But in IMHO proper action must be taken by @theicai. https://t.co/S3f1yVcITc
— CA AK Mittal (@CAamanmittal) July 9, 2024
3)
I strongly criticise the upcoming Webseries on @NetflixIndia , request @NetflixIndia to remove it from your platform immediately,
#boycott_CA_Topper, I urge everyone to report this issue https://t.co/MzHkFawnR0https://t.co/0DSJCrJneW#TribhuvanMishraCATopper pic.twitter.com/ZfSgnGeRWh— Ratan Singh Tanwar (@RATANSINGHTANW2) July 10, 2024
4)
Sir you may not know how much efforts go into being a good CA and that too a CA topper. So
You have freedom to make series but not insulting whole CA community and CA Aspirants and especially CA toppers by depicting that CA Topper does such things.Remove word CA from title.— Karan Chaudhari (@karan_k89147) July 9, 2024
5)
https://t.co/mnxyXONGwv
CA is one of the most prestigious professions in India.
How can any maker just wakeup one day and use the word CA for such absurd content?#ICAI @narendramodi @CaRANJEET @theicai @neerajarora91 @CAChirag @caanupam7 @nsitharamanoffc @PMOIndi @CaDayaniwas— CA Amrit Dagar (@dagar_amrit) July 9, 2024
तर समर्थन करणाऱ्यांपैकी एकाने, "खुल्या मानाने याकडे पहावं. यामधून तुमचं प्रोफेशन प्रमोट होईल. तुम्ही जॉली एलएलबी, डॉक्टर जी पाहिला आणि एन्जॉय केला. त्याचप्रमाणे हा सुद्धा पाहा," असं म्हटलं आहे.
या वादावर निर्मात्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. या वेब सीरिजचं दिग्दर्शन अम्रीत राज गुप्ता आणि पुनित कृष्णा यांनी केलं आहे. या वेब सीरिजमध्ये श्वेता बासू प्रसाद, शुभ्रज्योती भरत, फैजल मलिक, जितीन गुलाटी आणि इतर कलाकार आहे. ही वेब सीरिज 18 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.