छोट्या पडद्यावरील बहिणी लवकरच सुरू करणार 'कॅफे'

चाहत्यांना सर्व्ह करणार कॉफी

Updated: Dec 13, 2019, 12:23 PM IST
छोट्या पडद्यावरील बहिणी लवकरच सुरू करणार 'कॅफे'

मुंबई : कलाकार अभिनयासोबतच जोड व्यवसाय करताना दिसतात. असाच व्यवसाय छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या बहिणींना सुरू केला आहे. खुशबू आणि तितीक्षा तावडे या दोन्ही बहिणींनी 'कॅफे' सुरू करण्याचं निर्णय घेतला आहे. तशी तयारी देखील सुरू झाली आहे. 

तावडे भगिनी 'पॉकेट फुल ऑफ स्टोरीज' या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध गोष्टी शेअर करत असतात. आता या दोघींनी एक पाऊल पुढे टाकत नवा प्रयोग करायचं ठरवलं आहे. या दोघी बहिणी लवकरच कॉफी कॅफे सुरू करणार आहेत.तशा पोस्ट या दोघींनी सोशल मीडियावर केल्या आहेत. पण, त्यासाठी मुहूर्त आहे नवीन वर्षाचा. 

नवीन वर्षात दोघीही अभिनयासोबतच आपल्या आवडत्या प्रेक्षकांना आणि ग्राहकांना कॅफे सर्व्ह करताना दिसणार आहेत. तितीक्षाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कॉफी बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी त्याच्या कॅफेचं काम सुरू असतानाचा फोटो देखील पोस्ट केले आहेत.