Tarak Mehta: '...तर मी सर्वकाही विसरुन जायला तयार', जेनिफर मिस्त्रीप्रकरणात नवा ट्वीस्ट

 अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्या तक्रारीनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.  मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर काही तासांनंतर या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने यावर प्रतिक्रिया दिली असून त्यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 20, 2023, 05:12 PM IST
Tarak Mehta: '...तर मी सर्वकाही विसरुन जायला तयार', जेनिफर मिस्त्रीप्रकरणात नवा ट्वीस्ट  title=

TMKOC Jennifer Mistry: अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्या तक्रारीनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.  मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर काही तासांनंतर या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने यावर प्रतिक्रिया दिली असून त्यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.

जेनिफरच्या तक्रारीवरून मोदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शोमध्ये मिसेस रोशन सोधीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफरने मे २०२३ मध्ये मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतीन बजाज यांच्यावर छळाचा आरोप केला होता.

दरम्यान आता मोदींकडून माफी मागितल्यास मी सर्वकाही विसरायला तयार असल्याचे तिने म्हटले आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर बोलत होती.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका जवळपास 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. या मालिकेतील प्रत्येकातील कलाकारांचेही लाखो चाहते आहेत. आता मालिकेत टप्पू आणि सोनूची लव्ह स्टोरी दाखवण्यात येत आहे. त्यावरून जेठालाल आणि भिडे एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दरम्यान, या मालिकेत रोशन सिंग सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसावीलनं मालिकेला रामराम केला आहे. इतकंच नाही तर तिनं मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते.

जेनिफरमिस्त्री बंसीवालनं दोन महिन्यांपूर्वीच मालिकेसाठी शूट करणं बंद केलं. मालिकेच्या सेटवर प्रोजेक्ट हेड सोहेल आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांनी तिचा अपमान केल्याचे तिने म्हटले होते. 

मी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेसाठी माझं शेवटचं शूट हे 6 मार्च रोजी केलं होते. मला सेटवरून जायचं होतं. तर त्याचवेळी सोहेल आणि मालिकेचे कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांनी अपमान केला, असं जेनिफरने सांगितले होते.