या टॉप 5 अभिनेत्रींना मिळालेत सर्वात जास्त फॉलोअर्स

बॉलीवूड सेलिब्रिटी इन्स्टाग्रामद्वारे त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात.

Updated: Jan 3, 2022, 09:18 PM IST
या टॉप 5 अभिनेत्रींना मिळालेत सर्वात जास्त फॉलोअर्स title=

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात. बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित माहिती, पर्सनल लाईफ आणि जिमचे फोटो, व्हिडिओ इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करतात. आज आम्ही तुम्हाला त्या पाच बॉलिवूड स्टार्स बद्दल सांगणार आहोत जे इन्स्टाग्रामवर सगळ्यात लोकप्रिय आहेत. 

प्रियांका चोप्रा पहिल्या क्रमांकावर 
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे इंस्टाग्रामवर 72.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत ती पहिल्या क्रमांकावर येते.  प्रियांका चोप्राचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रचंड चाहते आहेत आणि त्याचा प्रभाव तिच्या सोशल मीडिया हँडलवरही दिसून येतो.

दुसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर
या यादीत प्रियंका चोप्रानंतर श्रद्धा कपूर दुसऱ्या क्रमांकावर येते. श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर 68.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टावर ती चित्रपटाशी संबंधित माहितीशिवाय, तिचं कुटुंब, जिम आणि स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

नेहा कक्कर तिसऱ्या क्रमांकावर आहे
या यादीत गायिका नेहा कक्कर तिसऱ्या क्रमांकावर आहे. नेहा कक्करचे इंस्टाग्रामवर 66.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती तिच्या गाण्यांशी संबंधित माहिती, पती  रोहनप्रीत सिंगसोबत तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ  शेअर करते.

चौथ्या क्रमांकावर दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोणचे इन्स्टाग्रामवर 63.4 मिलियन  फॉलोअर्स आहेत. दीपिका अनेकदा तिच्या बालपणीचे आणि शालेय दिवसांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. याशिवाय ती तिचे आवडते पदार्थ, तिच्या चित्रपटाशी संबंधित माहिती देखील शेअर करते.

पाचव्या क्रमांकावर कतरिना कैफ
अभिनेत्री कतरिना कैफचे इन्स्टाग्रामवर 60.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. या यादीत ती पाचव्या क्रमांकावर येते. ती तिच्या फोटोशूट, व्होकेशनशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अलीकडेच तिने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.