'ABCD 3' सिनेमाच्या टीमकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

'ABCD3'सिनेमाच्या सेटवर शहीदांना श्रद्धांजली वाहिली. 

Updated: Feb 17, 2019, 06:41 PM IST
'ABCD 3' सिनेमाच्या टीमकडून शहीद जवानांना श्रद्धांजली  title=

मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ 'ABCD3' सिनेमाच्या टीमने हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. 'ABCD3'सिनेमाच्या सेटवर शहीदांना श्रद्धांजली वाहिली. 'ABCD3'सिनेमाची संपूर्ण टीम सध्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सिनेमाची शूटिंग लंडनमध्ये सुरु आहे. 14 फेब्रुवारीरोजी संपूर्ण जग व्हेलेन्टाईन डे साजरा करत असताना पुलवामामध्ये दहशतवादी हल्लाचा सर्वांना धक्का बसला. 'ABCD3' सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डी'सूझा करत असून सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता वरुन धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे.
 

 पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आल्यामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. संपूर्ण देशात हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल अहमद दारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पाकिस्तानचा विरोध करण्यात आला सोबतच साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली. 
पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होत आहे.