'रेस्ट इन पीस इन ऍडव्हान्स' म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर Swara Bhasker भडकली म्हणाली...

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकतीच पोस्ट शेअर करून स्वतः कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली

Updated: Jan 8, 2022, 04:31 PM IST
'रेस्ट इन पीस इन ऍडव्हान्स' म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर Swara Bhasker भडकली म्हणाली... title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकतीच पोस्ट शेअर करून स्वतः कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. यानंतर अभिनेत्रीचे चाहते चिंता व्यक्त करत होते. तर  स्वराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर काही युजर्सने तिला मृत्यूच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. ज्याला प्रत्युत्तर देताना अभिनेत्रीने आपल्या उत्तराने सर्वांची बोलती बंद केल्याचं दिसत आहे. 

स्वरा भास्करच्या कोविड पॉझिटिव्हमधून बाहेर पडल्याची माहिती मिळताच एका यूजरनं लिहिलं, 'रेस्ट इन पीस इन अॅडव्हान्स'. तर दुसर्‍याने लिहिलं, 'मी 2022 मध्ये ऐकलेली सर्वोत्तम बातमी'. त्याचबरोबर इतर ट्रोलर्सनेही स्वरा भास्करवर नकारात्मक कमेंट करून तिचा द्वेष व्यक्त केला आहे. मात्र, अशा कमेंट्स पाहून अभिनेत्रीला धक्का बसला असून तिने ट्विट करून सर्वांची बोलती बंद केली आहे.

स्वराने लिहिलं की, 'माझ्या मृत्यूची इच्छा करणारे सर्व द्वेष करणारे आणि मला ट्रोल करणाऱ्या... मित्रांनो, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा... मला काही झालं तर तुमची रोजीरोटी हिसकावून घेतली जाईल.  तुमचं घर कसं चालेल? स्वरा भास्करने नुकतच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करून स्पष्ट केलं आहे की, तिला आणि तिच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वांना डोकेदुखी, ताप अशी लक्षणं दिसू लागली, त्यानंतर सर्वांची कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट आल्यावर तिच्यासह कुटुंबीयही कोरानाच्या विळख्यात सापडल्याचं समजलं. स्वराने चाहत्यांना सुरक्षित राहण्याचं आणि मास्क घालण्याचं आवाहनही केलं आहे.

स्वराने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'हॅलो कोविड, आत्ताच मला माझा आरटीपीसीआर रिपोर्ट मिळाला आहे आणि मी कोविड पॉझिटिव्ह आहे. क्वारंटाईनमध्ये स्वतःला वेगळे केलंय. ताप, डोकेदुखी, चव कमी होणं यासारखी लक्षणे जाणवत आहेत. मी दोन्ही लस घेतल्या आहेत. त्यामुळे लवकरच सर्वकाही ठीक होईल अशी आशा आहे. मी घरी आहे. तुम्ही पण सुरक्षित रहा.