28 दिवसांनंतर रूग्णालयातून घरी परतल्या लता दीदी

लता दीदींच घरी आल्यावर पहिलं ट्विट 

Updated: Dec 8, 2019, 07:09 PM IST
28 दिवसांनंतर रूग्णालयातून घरी परतल्या लता दीदी

मुंबई : निमोनिया झाल्यामुळे  गेल्या कित्येक दिवसांपासून रूग्णालयात असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर Lata Mangeshkar रविवारी आपल्या घरी परतल्या आहेत. लता दीदींनी स्वतः ट्वीटकरून याची माहिती दिली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरचा देवदूत असा उल्लेख करून त्यांचे आभार मानले आहेत.

28 दिवसांपासून आपण निमोनियावर उपचार घेत असल्याचं देखील त्या म्हणाल्या. आता प्रकृती ठिक असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दीदींवर उपचार सुरू होते. यावेळी डॉक्टर, परमेश्वर आणि आई बाबांचे आभार त्यांनी मानले आहेत. तसेच आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व चाहत्यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत. 

लता दीदींनी स्वतः ट्विट केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लता दीदींवर ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्याशिवाय घरी न आणण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला होता. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं जात आहे.