विक्रांत आणि ईशा एकमेकांत गुंतलेत का?

काय होणार पुढे? 

मुंबई : ४ सप्टेंबरच्या तुला पाहते रे च्या एपिसोडची सुरवात विक्रांतच्या ऑफिस मधून झाली. कामगारांकडून अपडेट्स घेऊन झेंडे आणि मायरा आपल्या सोबत घेऊन जात असताना ईशाच्या खाली टेबलाकडे पाहून विक्रांत क्षणभर तिच्या आठवणीत हरवून जातो. दरम्यान दुकानात साडी लावताना आपल्या लेकीसाठी ही अशीच साडी घेणार असे बोलत असताना ईशाच्या वडिलांना दुकान मालक बोचून बोलताना त्यांची लायकी काढतो. तेवढ्यात त्यांना भेटायला आलेली ईशा ते सारं लपून ऐकते.

संध्याकाळी ईशा गणपती मंदिरात जाऊन देवाला जाब विचारते की, मला दुःख नक्की कसले आहे? जॉब गेल्याचे की विक्रमला बघता येणार नाही याचं. पण गणपती कसलाच कौल ईशाला देत नाही. दरम्यान मंदिरातून निराशेने निघत असताना विक्रांत तिथे येऊन ईशाला भेटतो आणि ऑफिसला का आली नाहीस असे विचारतो. त्याला बघून ईशा फार खुश होते. दरम्यान उद्या ऑफिसला ये असे सांगून विक्रांत निघून जातो. तो जात असताना माझ्या मनात जे आहे तेच तुमच्या तुमचा मनात असेल तर मागे वळून बघाल असे मनातल्या मनात म्हणते आणि विक्रम वळून बघतो.

तो वळून बघताच ईशाचा चेहरा खुलून जातो. संध्याकाळी घरी जाताच ईशा आपली मैत्रीण रुपाली हिला घडला प्रकार सांगते आणि रूपातीलाही तिच्या आपल्या हाताच्या दोन बोटांमधील एक बोट निवडायला सांगते. दरम्यान रुपालीसुद्धा तिला हवे असलेले बोट निवडते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून रुपाली तिला सरंजाम्यांच्या प्रेमात तर पडली नाहीस असा प्रश्न विचारते. पण ईशा काहीच न बोलता फक्त रुपालीच्या गालाचा मुका निघून निघून जाते.