या अभिनेत्याची घरी आली नन्ही परी (फोटो)

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे गोड बातमी असल्याचं नुकतचं कळलं आणि सोशल मीडियात शुभेच्छांचा पाऊस पडला. आता यांच्या पाठोपाठ या अभिनेत्याच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 7, 2017, 01:39 PM IST
या अभिनेत्याची घरी आली नन्ही परी (फोटो)  title=

मुंबई : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्याकडे गोड बातमी असल्याचं नुकतचं कळलं आणि सोशल मीडियात शुभेच्छांचा पाऊस पडला. आता यांच्या पाठोपाठ या अभिनेत्याच्या घरी एका चिमुकलीने जन्म घेतला आहे. 

'आम्ही दोघे राजा राणी' या मालिकेत तुषार साली एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. त्याने त्याचसोबत 'सखी' या मालिकेत देखील आपल्याला तुषार एका भूमिकेत दिसला. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच 'क्राइम पेट्रोल' या कार्यक्रमातही प्रेक्षकांना त्याला अनेकवेळा पाहायला मिळते. 

तुषारने प्रतिक्षा सोबत २०१५ मध्ये लग्न केले होते. प्रतिक्षा ही देखील एक अभिनेत्री आहे. त्यांच्या दोघांच्या आयुष्यात एक नन्ही परी आली आहे. प्रतिक्षाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून तिनेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तुषार आणि तिच्या फॅन्सना सांगितली आहे. 

प्रतिक्षाने त्यांच्या मुलीचा फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण या फोटोत आपल्याला केवळ तिचे पाय पाहायला मिळत आहेत. या गोंडस पायावरून हे बाळ देखील तितकेच गोंडस असणार यात काही शंकाच नाही. तिने या फोटोसोबत म्हटले आहे की, या छोट्याशा बाळाच्या आगमनाने आमच्या आयुष्यात एक स्थान निर्माण केले असून आम्हाला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्ही या नव्या प्रवासासाठी सज्ज झालो आहेत. आमच्या आयुष्यात एका छोट्याशी परीचे आगमन झाले आहे.