'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

सौरभ तळेकर | Updated: Jul 2, 2024, 03:53 PM IST
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे? title=
Uddhav Thackeray Apologized maharastra

Vidhansabha Monsoon Session : विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अपशब्द वापरल्याबद्दल पाच दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्यावरून अंबादास दानवे यांच्यावर टीका होताना दिसते. अशातच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली. तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यांना जनतेनं निलंबित केलं, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. जय संविधान म्हटल्याने भाजपला मिरच्या झोंबल्या अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर एकतर्फी कारवाई केली, असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी बहीण-भावाच्या संबंधाबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार? असा खडा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला आहे. भाजपचं हिंदुत्वस म्हणजे राहुल गांधी यांचं हिंदुत्व नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.  त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. दानवेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यायला हवा, त्यांचे निलंबन झाले पाहिजे तसेच त्यांनी सभागृहाची माफी मागायला हवी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.