close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाहा लाडूचं बाळकृष्ण रूप : फोटो

पाहा लाडूचे खास फोटो 

पाहा लाडूचं बाळकृष्ण रूप : फोटो

मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात.

आता या मालिकेत गोकुळाष्टमीचा खास उत्सव दिसून येणार आहे. राणा आणि अंजली यांच्या आयुष्यात आलेला राजवीर हा त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि घरातला लाडका देखील आहे. त्यांचा हा लाडोबा बाळकृष्णासारखाच लाघवी आणि खोडकर आहे. गोकुळाष्टमीच्या उत्सवात वाड्यावर खास भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच लाडू बाळकृष्णचा अवतार धारण करणार आहे. घरातील संपूर्ण वातावरण भजनाच्या गजरात भक्तिमय होणार आहे.

राणा आणि अंजली श्रीकृष्णाच्या पूजेची जय्यत तयारी करत आहेत, तसेच पूजेनंतर लाडू दहीहंडी फोडणार आहे. गोकुळाष्टमी हा सण गायकवाडांच्या वाड्यात अत्यंत जोशात आणि आनंदात साजरा होणार आहे. त्यामुळे गोकुळाष्टमीचा हा उत्सव पाहायला विसरू नका तुझ्यात जीव रंगला मध्ये सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर!!!