रिक्षावाला फेम मानसी नाईककडून प्रेमाची कबुली

लवकरच अडकणार विवाहबंधनात 

Updated: Feb 6, 2020, 07:05 PM IST
रिक्षावाला फेम मानसी नाईककडून प्रेमाची कबुली  title=

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक जी आपल्या अभिनयासोबतच नृत्यामुळे लोकप्रिय आहे. ही अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करत मानसी नाईकने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. 

इंस्टाग्रामवर तिने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानसी म्हणते की,'यावर्षी मी स्वतःलाच गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे. ओळखा पाहू, मी स्वतःलाच भेटले आहे. मी प्रेमात पडले आहे. प्रदीप खारेरा माझ्या जगात तुझं स्वागत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

मानसी नाईकचा 3 फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला. या वाढदिवसादिवशीच तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1) on

प्रदीप आणि मानसी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सगळ्यांना याबाबत माहिती दिली आहे. कामाबद्दल बोलायचं झालं तर, मानसी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री असून नृत्य आणि स्टेज परफॉर्मन्स खूप खास असतात. रिक्षावाला आणि बाई वाड्यावर या दोन गाण्यांमुळे मानसी नाईक प्रकाशझोतात आली. तसेच मानसी नाईकने आतापर्यंत चार दिवस सासुचे, चला हवा येऊ द्या या सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

मानसी नाईक प्रदीप खारेरासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. प्रदीप आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून मॉडेल देखील आहे. फॅशन जगतातील लोकप्रिय चेहरा म्हणून प्रदीपचा उल्लेख होतो.