अभिनेत्रीवर माँजुलिकाचं वारं; गायकाला भरली धडकी

विस्कटलेले केस, रोखलेली नजर.... 

Updated: Feb 6, 2020, 07:06 PM IST
अभिनेत्रीवर माँजुलिकाचं वारं; गायकाला भरली धडकी
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी अभिनेत्री एकाएका माँजुलिकाच्या रुपात दिसल्यानंतर काय होईल, याची कल्पना जर तुम्ही केली नसेल तर आता थेट त्याचं उदाहरणच पाहा. कारण, एका अभिनेत्रीवर चक्क 'भूलभुलैय्या'तील माँजुलिकाचं वारं संचारल्याचंच पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर खुद्द त्या अभिनेत्रीच आपले हे फोटोही शेअर केले आहेत. विस्कटलेले केस, नर्तकीचा पेहराव, विस्कटलेलं काजळ आणि कुंकू आणि भेदरलेली नजर अशा रुपात ही अभनेत्री नाही म्हटलं तरी घाबरवतच आहे. ही अभिनेत्री आहे, उर्वशी रौतेला. 

एरव्ही जीम लूक, एखाद्या पुरस्कार सोहळ्यासाठीचा रेड कार्पेट लूक असे बहुविध प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या उर्वशीने नुकताच तिचा हा माँजुलिका लूक सर्वांसमोर आणला आहे. तिने हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच त्यावर अनेक कमेंट्स येण्यास सुरुवात झाली. 

काहींनी उर्वशीच्या या फोटोची प्रशंसा केली. तर, काहींनी तिला न ओळखल्याचीही प्रतिक्रिया दिली. गायक आणि रॅपर हनी सिंग, याने तिच्या फोटोवर अरे, मी तर घाबरलोच.... अशी कमेंटही केली. उर्वशीचा हा लूक नेमका कशानिमित्ताने होता हे अद्यापही कळलेलं नाही. पण, तो प्रकाशझोतात आला आणि उर्वशीच्याच चर्चा झाल्या हे मात्र खरं.

 
 
 
 

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'भूलभुलैय्या' या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने 'माँजुलिका'ची भूमिका साकारली होती. एका अतृप्त नर्तकीचा आत्मा नेमका काय अडचणी निर्माण करतो आणि परिस्थिती कशा पद्धतीने बदलते यावर अतिशय प्रभावीपणे आणि तितक्याच रंजक शैलीत या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला होता. विद्या बालन, अक्षय कुमार, असरानी, शायनी अहूजा असे कलाकार या चित्रपटातून झळकले होते. तेव्हापासूनच माँजुलिका हे पात्रंही प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरु लागलं.