रघुच्या ex wifeने लिहला भावूक संदेश

कारण ऐकून म्हणाल....

Updated: Jan 18, 2020, 09:39 PM IST
रघुच्या  ex wifeने लिहला भावूक संदेश
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नात्यांमध्ये येणारं प्रत्येक वळण हे त्या नात्याला वेगळीच दिशा देऊन जातं. या वाक्याचा प्रत्यय बऱ्याच सेलिब्रिटींच्या आणि दैनंदिन जीवनात अनेकांच्याच नात्यांमध्ये येत असतो. मुळात नात्यांमध्ये कोणत्याही टप्प्यावर अडकून न राहता पुढे जात राहणही तितकंच महत्त्वाचं असतं हेसुद्धा अनेकदा हे सिलिब्रिटी मंडळी सांगून जातात. सध्याही अशाच एका सेलिब्रिटी जोडीची पोस्ट सोशल मीडियावर नकळतपणे लक्ष वेधत आहे. 

एकेकाळी सेलिब्रिटी जोडी म्हणून ओळखला जाणारा सेलिब्रिटी टेलिव्हिजन सूत्रसंचालक, निर्माता रघु राम आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुगंधा गर्ग ही तिच नावं आहेत ज्यांच्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे रघु आणि त्याची दुसरी पत्नी नताली यांच्या जीवनात आलेला एक नवा पाहुणा. रघु आणि त्याची पत्नी नताली यांच्या जीवनात काही दिवसांपूर्वी एक नवा पाहुणा आला. याच पाहुण्याच्या स्वागतासाठी रघुच्या ex wifeनेही एक खास पोस्ट लिहिली. 

VIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज

खास म्हणण्यापेक्षा ही एक भावूक पोस्ट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

'हा फोटो सरलेली वेळ सांगत आहे.... रिदम.... तुझं या जगात स्वागत आहे... तू (जणू) दोन योद्ध्यांकडे जन्मला आहेस', असं कॅप्शन लिहित सुगंधाने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ज्यामध्ये रघू त्याच्या बाळाला, म्हणजेच 'रिदम'ला मोठ्या प्रेमाने घेऊन पाठमोरा उभा असल्याचं दिसत आहे. बरंच काही सांगून जाणारा हा फोटो म्हणजे नताली, रघु, सुगंधा आणि आता रिदमच्याही जीवनाला जोडणारा एक दुवा आहे, असं म्हणायला हरकत नाही.