सिद्धार्थ शुक्लाचा 'लूक अ लाईक' सोशल मीडियावर व्हायरल

सिद्धार्थ शुक्लाने काहि दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला.

Updated: Sep 13, 2021, 06:49 PM IST
सिद्धार्थ शुक्लाचा 'लूक अ लाईक' सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : सिद्धार्थ शुक्लाने काहि दिवसांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. त्याच्या अचानक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे आणि ते त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. सिद्धार्थ शुक्लाचे चाहते इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि ते सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. आता सिद्धार्थ शुक्लासारखा हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती चर्चेत आहे. ही व्यक्ती आहे चंदन. इन्स्टाग्रामवर चंदनचे 9 हजारांहून अधिक लोक फॉलोअर्स आहेत.

त्याचबरोबर, आता सोशल मीडियावर, सिद्धार्थ शुक्लाच्या लुकलाईकचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चंदन हा देखील सिद्धार्थ शुक्लाचा चाहता आहे आणि बऱ्याच काळापासून त्याच्या स्टाईलची कॉपी करत आहे. चंदन लिपसिन्सिंगद्वारे सिद्धार्थचा व्हिडिओ देखील बनवतो. सिद्धार्थ शुक्लाचे अनेक चाहते चंदनला पसंती देत ​​आहेत आणि अनेकजण त्याला तसं न करण्यास सांगत आहेत.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया 
चंदनने सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलसोबत अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये चंदन त्याची कॉपी करत आहे, मात्र, अनेक चाहत्यांनी त्याला सिद्धार्थची कॉपी न करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे काही लोक त्याच्या व्हिडीओला बकवास देखील म्हणत आहेत. तो सिद्धार्थच्या ड्रेसिंग सेन्स आणि लूकचीही कॉपी करतो.

2 सप्टेंबर रोजी झालं निधन 
सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र, त्याचा पोस्टमार्टमचा अहवाल अद्याप आलेला नाही. सिद्धार्थ शुक्ला फक्त 40 वर्षांचा होता. बिग बॉस 13 जिंकल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाची लोकप्रियता वाढली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शहनाजसोबतची मैत्री लोकप्रिय होती
त्याचबरोबर, बिग बॉसच्या घरातच शहनाज गिलसोबत त्याची मैत्री झाली. दोघांची मैत्री खूप प्रसिद्ध झाली. या दोघांचे अनेक म्युझिक व्हिडिओ देखील एकत्र आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दोघंही डिसेंबरमध्ये लग्न करणार होते आणि यासाठी त्यांनी बुकिंगही केली होती. दोघंही अनेक शोमध्ये एकत्र दिसले आहेत.

पण, त्याच्या अचानक जाण्यामुळे शहनाज गिललाही मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ती अतिशय वाईट अवस्थेत दिसली. सध्या शहनाज गिल सोशल मीडियापासून दूर आहे.