अक्षय कुमारचे 'या' अभिनेत्रीसोबत होते अफेअर? कळताच ट्विंकल खन्नाने सोडले होते घर, काय आहे प्रकरण?

अक्षय कुमारबाबत दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. अक्षय कुमारचे एका अभिनेत्रीसोबत अफेरच्या बातम्यांमुळे ट्विंकल खन्ना दुखावली होती. तिने घर देखील सोडले होते. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 20, 2024, 06:28 PM IST
अक्षय कुमारचे 'या' अभिनेत्रीसोबत होते अफेअर? कळताच ट्विंकल खन्नाने सोडले होते घर, काय आहे प्रकरण?

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनयासोबत अक्षय त्याच्या लाईफस्टाईलने देखील प्रचंड चर्चेत असतो. मात्र, सध्या अक्षय कुमार एका अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे. लग्नानंतर अक्षय कुमारचे नाव एका बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडले गेले होते. ज्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर आल्या होत्या.  अशातच आता दिग्दर्शक सुनील दर्शनने एक मोठा खुलासा केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

90 च्या दशकात सुनील दर्शन बरसात हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटात बिपाशा बसू, प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना प्रियंका आणि अक्षयच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. जेव्हा ट्विंकल खन्नाला हे समजले तेव्हा तिने अभिनेत्याचे घर सोडले. 

प्रियंकासोबत अफेअरच्या अफवा

युट्यूब चॅनल फ्रायडे टॉकीजशी बोलताना सुनील दर्शन म्हणाले की, अक्षय कुमार बरसात चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. चित्रपट सुरु होताच त्याला पत्नीसोबत विचित्र समस्या येऊ लागल्या. अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रासोबत बरसातचं शूटिंग पहिल्यांदा सुरु झालं. चित्रपटाचे शूटिंग शेड्यूलमध्ये करायचे होते आणि शेड्यूलच्या पाच दिवस आधी अक्षय कुमारने मला फोन करून भेटायला सांगितले. 

जेव्हा तो अक्षय कुमारला भेटायला गेला तेव्हा त्याने एक चुकीचा उल्लेख केला. ज्यामुळे त्याने बरसात चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक सुनील दर्शन म्हणाले की, काही चुका झाल्या होत्या. प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याबद्दल काही अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. 

यामध्ये चूक कोणाची? 

दिग्दर्शक सुनील दर्शन पुढे म्हणाले की, एक अभिनेता म्हणून तुम्ही जबाबदार असले पाहिजे. जर तुमची पत्नी अभिनेत्री असेल तर तिला इंडस्ट्रीबद्दल सर्व काही माहित आहे. तिने सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिला सर्व काही माहित होते मी यासाठी प्रियंकाला दोष देत नाही. तिच्या हितासाठी ती करत होती. 'बरसात'मध्ये बॉबी देओलच्या जागी अक्षय कुमारची वर्णी लागल्याची माहिती आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More