'...तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन'; विद्या बालन 'हे' काय बोलून गेली

Vidya Balan want to Marry Javed Akhtar : विद्या बालननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याशिवाय तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 20, 2024, 05:24 PM IST
'...तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन'; विद्या बालन 'हे' काय बोलून गेली title=
(Photo Credit : Social Media)

Vidya Balan want to Marry Javed Akhtar : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तब्बल 2 दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. तिनं आजवर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत आणि तिच्या टॅलेन्टनं सगळ्यांनी मने जिंकली आहेत. विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितलं की तिला जावेद अख्तर यांच्याशी लग्न करायचे होते. त्याशिवाय त्यांनी हे देखील सांगितलं की तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमांस करायची इच्छा होती. 

विद्या बालननं सांगितलं की जावेद अख्तरशी तिला लग्न करायचं होतं. तिनं त्या मागचं कारण देखील सांगितलं होतं. त्याचं कनेक्श हे अभिनेत्री शबाना आजमी यांच्याशी संबंधीत आहे. खरंतर, शबाना आजमी या विद्या बालनच्या आदर्श आहेत. इतकंच नाही तर त्या जे काही काम करतात ते विद्याला खूप आवडतं आणि तिला त्यांच्यासारखंच व्हायचं आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखती दरम्यान, याविषयी सांगितलं आहे. तिनं सांगितलं की जर जावेद अख्तर यांच्याशी लग्न केल्यानंतर मी शबाना आजमी होऊ शकत असेन तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्यास तयार आहे. विद्या बालननं तिचं शबाना आजमी यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी हे वक्तव्य केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शबाना आजमी यांच्याशिवाय विद्या बालन आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा उल्लेख केला आणि तो म्हणजे अमिताभ बच्चन यांता. तिला अमिताभ बच्चन हे खूप आवडतात किंवा ती त्यांची चाहती आहे. तिनं बिग बींसोबत स्क्रिन शेअर केली आहे पण तरी सुद्धा तिला आता त्यांच्यासोबत रोमांस करायचा आहे. तिनं याविषयी सांगत एका जुन्या मुलाखतीत सांगितलं की ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचं लोकप्रिय असलेलं गाणं ‘आज रपट जाएं’ या गाण्यावर डान्स करायचा आहे. पण तिला पा चित्रपटात देखील अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिचं बिग बींसोबत रोमान्स करण्याचं स्वप्न हे अपूर्णच राहिलं. 

हेही वाचा : विवियन डीसेनाशी घटस्फोटानंतर वाहबिजला ऐकावे लागले टोमणे; विभक्त झाल्याच्या 3 वर्षानंतर अभिनेत्रीचा खुलासा

दरम्यान, विद्या बालनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती आता भूलभुलैया या चित्रपटाच्या सीरिजच्या 3 ऱ्या भागात दिसणार आहे. या फ्रॅन्चायझीच्या पहिल्या भागात ती अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. तर आता येणाऱ्या तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x