आमचा कोहिनूर आणि दोन अनमोल रत्न माल्‍या व ललित मोदीला परत करा; Twinkle Khanna ची ब्रिटनला विनंती

Twinkle Khanna Asked To Return Kohinoor From Britisher: बॉलिवूड अभिनेता ट्विंकल खन्ना ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते ट्विंकल ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता ट्विंकलनं थेट ब्रिटनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात ट्विंकलनं त्यांना आपला कोहिनूर परत करण्याची विनंती केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 15, 2023, 07:13 PM IST
आमचा कोहिनूर आणि दोन अनमोल रत्न माल्‍या व ललित मोदीला परत करा; Twinkle Khanna ची ब्रिटनला विनंती title=
(Photo Credit : Social Media)

Twinkle Khanna Asked To Return Kohinoor From Britisher: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी, अभिनेत्री आणि लेखक ट्विंकल खन्ना ही नेहमीच चर्चेत असते. ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. ट्विंकल ही तिच्या मनमोकळेपणानं बोलण्यासाठी ओळखली जाते. तिला कोणत्याही गोष्टीवर काही बोलायचे असेल तर ती बिनधास्तपणे बोलते. दरम्यान, आता ट्विंकलनं थेट ब्रिटेनचे राजा किंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेनंतर एक पोस्ट शेअर करत त्यांची खिल्ली उडवली आहे. तिनं यावेळी पोस्ट शेअर करत भारताला त्यांचा कोहिनूर हिरा आणि त्यासोबतच से 'दो और अनमोल रतन' विजय माल्‍या आणि ललित मोदी भारताला परत देण्यास सांगितले आहे. 

काही दिवसांपूर्वी ‘बकिंघम पॅलेस’ नं म्हटलं होतं की राणी एलिझाबेथच्या निधनानंतर चर्चेत असणारा ‘कोहिनूर’ हा हिरा राजाच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून दूर ठेवण्यात येईल. ट्विंकलनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत एक पत्र दाखवलं आहे. या पत्रात ट्विंकल म्हणाली, 'पारंपरिक पद्धतीनं राणीनं तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी हिऱ्यांनी जडवलेला मुकुट परिधान केला होता. पण या वेळी ‘बकिंघम पॅलेस’ने औपचारिक कारवाईत ‘कोहिनूर’चा वापर केला जाणार नाही, असे निवेदन जारी केले. याच कारणामुळे भारतीय पुन्हा एकदा ‘कोहिनूर’ परत करण्याची मागणी करीत आहेत. मी ब्रिटनकडे फक्त ‘कोहिनूर’च नाही तर आमचे दोन अनमोल रत्न, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांनादेखील भारताकडे सुपूर्द करा ही विनंती.' ट्विंकलची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

कोहिनूर हिऱ्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? 

कोहिनूरचा अर्थ फारसीमध्ये ‘प्रकाशाचा पर्वत असा आहे. कोहिनूर हा हिरा 105 कॅरेट वजनाचा आहे. तर हा हिरा दक्षिण भारतातील कृष्णा नदीच्या काठी हा 800 वर्षांपूर्वी सापडल्याचे म्हटले जाते. त्यानंतर हा हिरा वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत होता अखेर 19 व्या शतकात तो ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात देण्यात आला. असे काही या कोहिनूर हिऱ्याविषयी बोलले जाते. तर असेही म्हटले जाते ही कोहिनूर हा एक शापित हिरा आहे. त्यामुळे तो फक्त आणि फक्त केवळ स्त्रिसांसाठी आणि त्यातही राणी असेल तर तिच्याचसाठी सुरक्षित आहे. तर भारतानं देखील ब्रिटनला हा हिरा परत करण्याची विनंती केली होती.

हेही वाचा : 'अंघोळ करताना..., Prajakta Mali नं सांगितले दागिने घालण्याचे महत्त्व

ट्विंकल खन्ना ही नेहमची तिच्या अशा विनोदी वक्तव्यांसाठी ओळखली जाते. एकदा तर अक्षयनं सांगितलं होतं की जेव्हा ट्विंकल काही पोस्ट करते तेव्हा मला खूप भीती वाटत असते की ती काय म्हणाली आहे.