प्रेग्नेंसीवर टीका करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर

एप्रिल फूलच्या दिवशी शेअर केली गोड बातमी 

Updated: Apr 6, 2021, 05:09 PM IST
प्रेग्नेंसीवर टीका करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर  title=

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) हिने काही दिवसांपूर्वी Good News शेअर केली आहे. अभिनेत्रीने या बातमीसह पाच महिन्यांच्या बेबी बंपचे फोटो पोस्ट केले आहेत. एप्रिल फूलच्या दिवशी उर्मिलाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे (Urmila Nimbalkar Share Pregnancy News ) सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलर्सला उर्मिलाने अतिशय सडेतोड उत्तर दिलं आहे. 

बेबी बंपसह अतिशय बोल्ड लूकमध्ये उर्मिलाने आपले फोटो शेअर केले. प्रेग्नेंसी अनुभवतानाचा तिचा आनंद या फोटोत दिसून येतो. या फोटोंवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अगदी तसंच काहींनी उर्मिलावर टीका देखील केली आहे. या टीकाकारांना उर्मिलाने खूप स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. 

काय म्हणतेय उर्मिला निंबाळकर 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

या ट्रोलर्सना उर्मिलाने आणखी एक इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे चोख उत्तर दिले आहे. उर्मिलाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या सपाट पोट आणि बारीक कंबरेला सुंदर दिसतेस, सेक्सी दिसते म्हणणाऱ्या सर्वांना, जगातील सर्वात नैसर्गिक आणि आनंदाची उधळण करणाऱ्या गोंडस गर्भारपणातील वाढलेल्या पोटाला पाहिल्यावर ‘प्रदर्शन करतेय’ म्हणणाऱ्या सर्व पुढारलेल्या पुरुष आणि दुर्दैवानं स्त्रियांना माझा सलाम आहे. तोपर्यंत मातृत्वाच्या प्रवासातील, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं चालूच राहिल. ' उर्मिलाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

त्याचप्रमाणे उर्मिलाने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या पाच महिन्यांचा प्रवास मांडला आहे. या पाच महिन्यात ती कुठे कुठे गेली. कोण कोणत्या ठिकाणी गरोदरपणात तिने प्रवास केलं हे म्हटलं आहे. I Was Pregnant Here... म्हणतं तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.