गुलाबी थंडीत उर्फी जावेदचा गुलाबी लूक, अभिनेत्रीच्या हॉटनेसचा सोशल मीडियावर तडका

उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.

Updated: Jan 11, 2022, 04:16 PM IST
गुलाबी थंडीत उर्फी जावेदचा गुलाबी लूक, अभिनेत्रीच्या हॉटनेसचा सोशल मीडियावर तडका

मुंबई : हॉटनेस आणि बोल्डनेसचा विचार केला तर लोकांच्या मनात उर्फी जावेदचं नाव सगळ्यात आधी समोर येतं. उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. नेहमीप्रमाणेच यावेळीही उर्फी जावेदने  हॉट फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

प्रसिद्धीच्या झोतात राहणारी उर्फी जावेद कधीही काहीही करते. आपल्या विचित्र ड्रेसमध्ये एकापेक्षा एक पोझ देणाऱ्या उर्फीने यावेळी असं काही केलं आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, उर्फी  खरच खूपच बोल्ड आहे.

पँन्टची बटणं उघडत दिल्या पोज
या फोटोत उर्फीने तपकिरी रंगाची पँट परिधान केली आहे. याचबरोबर उर्फीच्या या फोटोत तिच्या पँन्टची बटणं देखील उघडी असल्याचं दिसत आहे.  या फोटोत उर्फी पँन्टची बटणं उघडून स्माईल देताना दिसत आहे. फोटोत उर्फीने गुलाबी रंगाचा ब्रॅलेट टॉप घातला आहे या लूकला पूर्ण करण्यासाठी उर्फीने एक छोटी पोनी बांधून बाकिचे केस मोकळे सोडले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. उर्फीने गुलाबी रंगाच्या ब्रॅलेटसोबतच या कपड्यांना मॅचिंग असे कानातले घातले आहेत. यासोबतच या फोटोंच्या पोजमध्ये ती मोकळे केस ठेवून केसांशी खेळताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कॅप्शमध्ये लिहिलं की,  'डान्ससोबत हसतानाचा हा फोटो... तेही विनाकारण.'