मुंबईः बिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांसाठी ओळखली जाते. मात्र ईदसाठी उर्फीने खास लूक केला आहे. तिचा हा लूक मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.
ईदनिमित्त उर्फी जावेदने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. साडीवर उर्फीने मॅचिंग हूप कानातले घातले आहेत आणि नाकात नोज रिंगही घातली आहे. तसंच तिने मोकळ्या केसांसह न्यूड मेकअप केला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी गायक जावेद अलीच्या ईद हो जायगी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सर्वांना उर्फीच्या लूकची स्तुती केली आहे तसंच ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. उर्फीने रमजानच्या शेवटच्या दिवशीही डोक्यावर दुपट्टा घेत सलवार सूटमधला व्हिडीओ शेअर केला होता. या लूकलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती. नेहमीचा विचित्र कपड्यांची फॅशन सोडून उर्फीने ईदला पारंपारिक वेषात गाण्यावर डान्स करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत..
उर्फीचा लूक नेहमीच चर्चेत
उर्फी जावेदचा लूक हा नेहमीच चर्चेत असतो. कधी ट्रान्सपरंट पँट तर कधी अंगावर चिटकवलेली फुलं अशा विविध फॅशन करून उर्फी नेहमी चर्चेत राहते. सोशल मीडियावर उर्फी जावेद नेहमी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होते मात्र तिला या ट्रोलर्सचा फरक पडत नाही.